श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे व व्यापाऱ्यांचे उपोषण सुरुच...उपोषणाचा दहावा दिवस..... श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चे चेअरमन व संचालक कामगारांच्या उपोषणाला भेट का देत नाहीत?. कामगारांशी माध्यमांचा समोर खुली चर्चा करणार का?...कामगारांचा सवाल
पंढरपूर ( प्रतिनिधी) मनुष्य काम करतो कशासाठी तर आपले कुटुंब जगविण्यासाठी, मुलामुलींचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी म्हातारपण सुखात जावे म्हणून चार पैसे बचत करण्यासाठी मनुष्य काम करतो.
जर या काम करणाऱ्या कामगारांना पगार जर कित्येक महिने मिळत नसेल तर त्या कामगाराने काय करावे कसे जगावे.याचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार न करणाऱ्या संस्था चालकांच्या वर शासन काही कार्यवाही करणार की नाही? आपल्या न्याय हक्कासाठी थकीत वेतनासाठी उपोषणाला बसावे लागते.कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पहाणाऱ्या श्री.विठ्ठल सह.साखर कारखान्याच्या बोलघेवड्या चेअरमन व संचालकांनी गेली दहा दिवस आमरण उपोषणाला कामगार बसले आहेत दोनशे कामगारांचे ३१ महिन्याचे वेतन सेवानिवृत्त कामगारांचे ग्रॅज्युटी चे पैसे तसेच पंधरा टक्के,बारा टक्के फरक बोनस आदी लाखो रुपये ची रक्कम थकित आहे.
शासना कडून कोट्यावधी रुपयांचा निधी कामगारांचे थकीत वेतनासाठी व व्यापाऱ्यांची देणी भागवण्यासाठी दिली असता ती रक्कम का दिली जात नाही.कित्येक कामगार मृत पावले, कित्येक कामगार आजारी आहेत.त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम दिली गेली नाही.कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाला कारखान्याच्या सत्तेवर राहण्याचा काही अधिकार नाही...ज्या शेतकरी, कष्टकरी कामगार यांच्या जीवावर मस्तमौला म्हणून ओळखले जाणाऱ्या नेत्यांनी कामगारांच्या घामाचे पैसे त्वरित मिळावे म्हणून गेली कित्येक दिवसांपासून कामगार आपले घरदार मुलंबाळं गावी सोडून पुणे येथील साखर आयुक्तालय येथे उपोषणाला बसावे लागले आहे.शासनाने कडक धोरण अवलंबून या कामगारांचे थकीत वेतन,व अन्य रक्कम त्वरित देण्यात यावी. अशी मागणी उपोषण कर्ता कामगारांच्या वतीने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चे माजी व्हाईस चेअरमन युवराज पाटील यांनी आज आमरण उपोषणाला बसलेल्या कामगारांना भेट दिली.युवराज पाटील यांनी आपल्या मुलाखती मध्ये कामगारांच्या मागण्या या रास्त असून महाराष्ट्र शासन उपमुख्यमंत्री अजित पवार,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कामगारांना न्याय मिळवून द्यावा.अशी मागणी देखील करण्यात आली.
या दरम्यान अनेक कामगारांनी आपल्याला मनोगतात त्यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चे चेअरमन व संचालक मंडळ हे साधे विचारपूस करायला देखील आले नाहीत.आम्ही देखील सभासद आहोत.आम्हाला कुणाचेही आर्थिक मदत मिळली. नाही.आम्ही कामगारांनी वर्गणी गोळा करून खर्च करीत आहोत.आम्हा कामगारांशी चेअरमन व संचालक मंडळांनी माध्यमाच्या समोर खुली चर्चा करावी असे आवाहन कामगारांच्या वतीने करण्यात आले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा