पोस्ट्स

"शासन भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करतात. परंतु त्यांच्या न्याय हक्क मागण्या या पूर्ण करत नाहीत"....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांच्या वतीने सर्व कर्मचारी तांत्रिक व सुधारित वेतनश्रेणी आणि अन्य मागण्यासाठी दिनांक 15 मे 2025 पासून पुकारलेल्या बेमुदत संपात ते कर्मचारी सामील झालेले आहे. त्यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी त्यांनी या बेमुदत संपाचा अवलंब केलेला आहे.     महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करतात परंतु त्यांच्या न्याय हक्क मागण्यांच्या कडे दुर्लक्ष करून त्या मागण्या त्या पूर्ण करत नाहीत. शासनाचा शंभर दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये कामाची पावती म्हणून कर्मचारी यांनी केलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी भूमी अभिलेख विभागात द्वितीय क्रमांक देऊन गौरव केलेला आहे. परंतु सुधारित वेतनश्रेणी या प्रमुख मागणीबाबत कोणती टिप्पणी करण्यात त्यांनी आलेली नाही.      भूमी अभिलेख खात्यातील कर्मचारी यांना सद्यस्थितीला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यात येते. महाराष्ट्र राज्य शासनाचे इतर विभागातील भूमापक यांना देण्यात येणारी वेतनश्रेणी पाहता शासनाचा दुजाभाव दिसून येतो .त्या...

"राजकारणा पेक्षा समाजकारणाला महत्व देत सर्व सामान्य जनता , शेतकरी, युवकांना आर्थिक बळ देण्याचे काम मनसेच्या वतीने करण्यात येत असते".....मनसे नेते दिलिप बापू धोत्रे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त महत्व दिलेले आहे . सर्वसामान्य शेतकरी सर्व सामान्य जनता त्याचप्रमाणे बेरोजगार युवक युवती यांना यांच्या हाताला काम देण्याचा उद्देशाने धोत्रे ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड या उद्योग समूहाच्या वतीने आम्ही हॉटेल ,पेट्रोल पंप ट्रॅक्टर शोरूम असा विविध छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी वर्ग तसेच बेरोजगार युवकांना  त्यांच्या हाताला काम देण्याची व त्यांच्या आर्थिक परिस्थिती ला बळ देण्याच्या उद्देशाने आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आलेलो आहोत.      मंगळवार दिनांक 20 मे 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता पंढरपूर येथील अहिल्या चौक पंढरपूर टेंभुर्णी रोड भटुंबरे या ठिकाणी ग्रँड ट्रॅक्टर या नूतन व्यवसायाची सुरुवात करीत आहोत. या ग्रँड ट्रॅक्टरचे व्यवसायाचे उद्घाटन मनसेचे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळासाहेब नांदगावकर यांच्या शुभहस्ते व माननीय ह.भ.प वसंतराव नागदे चेअरमन धाराशिव जनता सहकारी बँक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास असंख्य राजकीय तसेच सामाजिक नेत...

" कॅरिडाॅर बाधितानी सर्व्हे करणाऱ्यांना माहिती देण्यास विरोध दर्शविला." शासन काय निर्णय घेणार?

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी). काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी पंढरपूर येथे कॅरिडॉर बाधीत रहिवासी, व्यापारी,दुकानदार यांच्याशी संवाद साधला असता कॅरिडाॅर हा पंढरपूर शहराला कसा लाभदायक असणार आहे.याची माहिती दिली.वाढत्या भाविकांच्या गर्दीमुळे भाविकांना सुलभतेने दर्शन व शहरात वावरता येत नाही.काही अनवधानाने दुर्घटना घडल्यास गर्दीमध्ये भाविकांना मदत करता येणार नाही म्हणून शहरातील रस्ते व मंदिर परिसरात हा कॅरिडाॅर होणे गरजेचे आहे.असे प्रशासनाचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.त्यानुसार या बाधित परिसरात महाविद्यालयाचे विद्यार्थीच्या मदतीने सर्व्ह केले जात असताना शहरातील काही भागात या सर्व्हे करणाऱ्यांना विरोध दर्शविला गेला व या सर्व्हे करणाऱ्यांना माहिती देऊ नका असे आवाहन पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे वतीने केले जात होते.    अशाप्रकारे विरोध काही बाधीत रहिवासी व्यापारी दुकानदार करीत असल्याने शासन काय निर्णय घेणार या कडे पंढरपूर वासी चे लक्ष लागले आहे.

"अतिक्रमण करणाऱ्यानो सावधान " सोमवार पासून अतिक्रमण विरोधी कडक मोहिम "....... जिल्हाधिकारी

 पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर शहर श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वैकुंठ भूमी आज शहराच्या चौफेर बाजूने हे शहर वाढत असल्याचे दिसून येत आहे.       लोकसंख्येच्या वाढीबरोबरच पंढरपूर शहरांमध्ये आषाढी कार्तिकी या वारी ला येणारे भाविक भक्तांची संख्या वाढत असलेली दिसून येत आहे. दरवर्षी कोठ्यावधीच्या संख्येने भावी भक्त या पंढरपूर शहराला भेट देत असतात. या पंढरपूर शहरांमध्ये आल्यानंतर भावीक भक्तांना रस्त्यावर अतिक्रमण हे सर्वत्र झाल्याचे दिसून येते. भाविकांना पायी चालताना फुटपाथ चा वापर करावा असे जरी वाटले तर त्यांना या फुटपाथवरून चालता येत नाही .कारण दुकानाच्या समोरील फुटपाथ वर खुद्द त्या दुकानदाराने अतिक्रमण केलेले असते किंवा हातगाडी व्यापारीनी हे फुटपाथ व्यापलेले दिसून येते. पंढरपूर शहरातील सर्वच रस्त्यावरून सद्यस्थितीला अतिक्रमण हे दिसून येत आहे. या अतिक्रमण हटावची जबाबदारी नगरपालिकेची असताना देखील नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.      पंढरपूर शहरात प्रत्येक रस्त्याला अतिक्रमण हे झालेले अस...

"पंढरपूर शहराचा विकास होतो आहे.या पुढे अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी नगरपालिकेची"

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी...     पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा या आराखड्याच्या अंतर्गत पंढरपूर शहराचा आता विकास होऊ पाहत आहे त्याचप्रमाणे पंढरपूर शहराला जोडणारे सर्व रस्ते हे प्रशस्त होत असून नुकतेच पालखी मार्ग वाखरी ते पंढरपूर शहर या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शहराला जोडणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेले अतिक्रमण शासनाने काढलेले असून आजच्या घडीला हा रस्ता अतिशय प्रशस्त आणि मोठा झालेला दिसून येत आहे पंढरपूर शहराला नाविन्याची त्याचप्रमाणे आधुनिक हिची सुरुवात या विकासा आराखड्याच्या माध्यमातून होत असलेले आपण पाहत आहोत      पंढरपूर शहर हे अतिक्रमणग्रस्त असलेले शहर म्हणून ओळखले जाते शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर झोपडपट्टी तसेच अन्य छोटे मोठे व्यवसाय हे अतिक्रमण करून चालवले जात असल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे पंढरपूर शहराला अतिक्रमानाने ग्रासलेले आहे हे चित्र संपूर्ण शहरभर आपल्याला दिसून येते आता या नवीन होणाऱ्या रस्त्याच्या लगत कुठलेही अतिक्रमण  होणार नाही याची काळजी पंढरपूर नगरपरिषद तसेच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आजी-माजी नगरसेव...

विश्वजित (मुन्ना) भोसले यांची पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य पदी निवड..

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी..      पंढरपूर शहरातील शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांची पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी त्यांची आज निवड करण्यात आली.       विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांच्या समाज कार्याला अजूनही वाव मिळावा त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील गोरगरीब रुग्ण यांची सेवा घडावी या उद्देशाने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी त्यांची ही निवड करण्यात आली.     विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांनी आजपर्यंत त्यांनी पंढरपूर शहरांमध्ये असंख्य वेळा रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर तसेच गोरगरिबांचे शासकीय कार्यालयामधील अडीअडचणी व कामे त्यांनी केलेली आहे त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे.

"मनगटात जर ताकद आणावयाची असेल तर संविधानाचा अभ्यास केला पाहिजे"...मा.मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे सर

इमेज
 पंढरपूर.प्रतिनिधी... प्रस्थापितांच्या विरोधात आणि अन्यायाच्या विरोधात जर उभे राहायचे असेल तर आपल्या मनगटामध्ये ताकद असायला हवी जर का मनगटामध्ये ताकद आणावयाची असेल तर प्रत्येकाने संवेदनाचा अभ्यास करायला हवा असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी आज पंढरपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित असलेले माजी नगरसेवक डी राज सर्व गोड यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामधील विविध क्षेत्रांमध्ये आपली उच्च कामगिरी करीत असलेल्या मान्यवरांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला या ओळी बोर्ड असताना माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.       डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्येची कास धरल्यामुळे त्यांनी आपल्या जीवनामध्ये असंख्य पदव्या संपादित केल्या संपूर्ण जगभरातील राज्यघटनेचा अभ्यास करून त्यांनी आपल्या भारत देशाची संविधान मसुदा निर्माण केला. स्वातंत्र्य समता बंध...