"पंढरपूर शहराचा विकास होतो आहे.या पुढे अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी नगरपालिकेची"
पंढरपूर प्रतिनिधी...
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा या आराखड्याच्या अंतर्गत पंढरपूर शहराचा आता विकास होऊ पाहत आहे त्याचप्रमाणे पंढरपूर शहराला जोडणारे सर्व रस्ते हे प्रशस्त होत असून नुकतेच पालखी मार्ग वाखरी ते पंढरपूर शहर या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शहराला जोडणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेले अतिक्रमण शासनाने काढलेले असून आजच्या घडीला हा रस्ता अतिशय प्रशस्त आणि मोठा झालेला दिसून येत आहे पंढरपूर शहराला नाविन्याची त्याचप्रमाणे आधुनिक हिची सुरुवात या विकासा आराखड्याच्या माध्यमातून होत असलेले आपण पाहत आहोत
पंढरपूर शहर हे अतिक्रमणग्रस्त असलेले शहर म्हणून ओळखले जाते शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर झोपडपट्टी तसेच अन्य छोटे मोठे व्यवसाय हे अतिक्रमण करून चालवले जात असल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे पंढरपूर शहराला अतिक्रमानाने ग्रासलेले आहे हे चित्र संपूर्ण शहरभर आपल्याला दिसून येते आता या नवीन होणाऱ्या रस्त्याच्या लगत कुठलेही अतिक्रमण होणार नाही याची काळजी पंढरपूर नगरपरिषद तसेच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आजी-माजी नगरसेवकांनी दक्षता घेऊन आपापल्या वार्डामध्ये अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशी अपेक्षा संपूर्ण शहरवासी करीत असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा