"राजकारणा पेक्षा समाजकारणाला महत्व देत सर्व सामान्य जनता , शेतकरी, युवकांना आर्थिक बळ देण्याचे काम मनसेच्या वतीने करण्यात येत असते".....मनसे नेते दिलिप बापू धोत्रे.
पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त महत्व दिलेले आहे . सर्वसामान्य शेतकरी सर्व सामान्य जनता त्याचप्रमाणे बेरोजगार युवक युवती यांना यांच्या हाताला काम देण्याचा उद्देशाने धोत्रे ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड या उद्योग समूहाच्या वतीने आम्ही हॉटेल ,पेट्रोल पंप ट्रॅक्टर शोरूम असा विविध छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी वर्ग तसेच बेरोजगार युवकांना त्यांच्या हाताला काम देण्याची व त्यांच्या आर्थिक परिस्थिती ला बळ देण्याच्या उद्देशाने आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आलेलो आहोत.
मंगळवार दिनांक 20 मे 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता पंढरपूर येथील अहिल्या चौक पंढरपूर टेंभुर्णी रोड भटुंबरे या ठिकाणी ग्रँड ट्रॅक्टर या नूतन व्यवसायाची सुरुवात करीत आहोत. या ग्रँड ट्रॅक्टरचे व्यवसायाचे उद्घाटन मनसेचे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळासाहेब नांदगावकर यांच्या शुभहस्ते व माननीय ह.भ.प वसंतराव नागदे चेअरमन धाराशिव जनता सहकारी बँक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास असंख्य राजकीय तसेच सामाजिक नेते मंडळी कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.
दिलीप धोत्रे पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलत असताना त्यांनी पुढील माहिती दिली ग्रँड ट्रॅक्टर च्या वतीने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीच्या वेळी लकी ड्रॉ च्या माध्यमातून विजेत्या शेतकऱ्याला थार गाडी भेट देण्यात येणार आहे. तसेच अन्य ट्रॅक्टर्स खरेदीधारकांना भेटवस्तूचा लाभ मिळणार आहे. गरीब शेतकऱ्यांना सुलभ कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ग्रँड ट्रॅक्टर च्या माध्यमातून 50 ते 60 युवक युवतींना रोजगार उपलब्ध होणार असून त्यामुळे बेरोजगार युवकांच्या हाताला आर्थिक बळ मिळणार आहे. अशी माहिती मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज रोजी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा