पोस्ट्स

भाजी विक्रेताचा मुलगा झाला C.A.

 भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला सीए पंढरपूर...प्रतिनिधी- पंढरपूर येथे भाजी विकणाऱ्या विठ्ठल गुंड यांच्या मुलाने अतिशय खडतर परिश्रम घेऊन आपल्या घरच्या गरीब परिस्थितीवर मात करून ऋषिकेश गुंड यांनी वयाच्या 24 व्या वर्षी सीए ची परीक्षा उत्तीर्ण होऊन नावलौकिक मिळवलेला आहे.     ऋषिकेश याचे वडील विठ्ठल गुंड हे पंढरपूर येथील इसबावी परिसरामध्ये भाजी विकण्याचा उद्योग करतात ऋषिकेश ची आई पिठाची गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह करून संसाराला हातभार लावतात. घरची हालाखीची परिस्थिती ओळखून ऋषिकेश यांनी आपले शिक्षण सुरू ठेवून ते अन्यत्र काम करून शिक्षणाचा खर्च भागवीत असे. ऋषिकेश यांनी आपले दहावीपर्यंत शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे यशवंत विद्यालय पंढरपूर येथे पूर्ण करून पुढील शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील कॉमर्स कॉलेज यामध्ये प्रवेश गुण पुढील शिक्षण पूर्ण केले. या कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान त्यांनी या पदवी काळामध्ये केला. त्यानंतर ऋषिकेश यांनी पुढील शिक्षणासाठी सीए ची परीक्षा देण्यासाठी त्यांनी पुणे शहर गाठले पुणे येथे गेल्यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च खाजगी क्षेत्रामध्ये काम करून...

"आमदार समाधान आवताडे यांना मंत्री पद मिळावे"........

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी...... पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामधून सलग दुसरे वेळी आपल्या कार्याच्या जोरावर त्यांनी या मतदारसंघामधून विजय मिळवत आपण या मतदार संघातील योग्य प्रतिनिधी असल्याचे सिद्ध केले आहे.     पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये हजारो कोटींचा विकास निधी आणून विकास कामाना गती देण्याचे काम केले आहे.मंगळवेढा तालुक्यातील कित्येक गावाला पिण्याचे पाणी तसेच शेतीला मुबलक पाण्याची सोय म्हणून आवताडे यांनी मंगळवेढा उपसा सिंचन, आणि तामदर्डी बंधारा अशा प्रकारे त्यांनी या भागातील पाणीप्रश्न मिटवण्याचे प्रयत्न करुन ते मार्गी लावले  आहे.     पंढरपूर शहरातील विकास कामे, मराठा भवन आणि मतदार संघात असंख्य ठिकाणी समाज मंदीर, संविधान भवन, व्यायाम शाळा उभारणी, ग्रामीण भागातील रस्ते, आदी असंख्य कामे त्यांनी आपल्या आमदारकीच्या चार वर्षीच्या कारकिर्दीत पूर्ण केली आहेत.     एक सुशिक्षित उच्चविद्या धारण करणारे हे युवा नेतृत्व या मतदार संघाला लाभले आहे. आज पर्यंत या मतदार संघाला कोणतेही मोठे पद लाभलेले नाही. आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या अभ्यासूपणाने त्यांनी मह...

"समाधान आवताडे यांनी विजयाची परंपरा राखली"...

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी....  पंढरपूर मंगळवेढा विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये चुरशीची झालेली ही निवडणूक या निवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी पुन्हा एकदा विजय प्राप्त करत ही विजयाची परंपरा राखली.      आज पर्यंत पंढरपूर तालुक्यामधून जेष्ठ माजी आमदार होऊन गेले. त्या पेकी कै. औदुंबर आण्णा पाटील हे सलग दोन तीन वेळा निवडून आले. त्यानंतर कै. सुधाकरपंत परिचारक हे देखील सलग तीन चार वेळा निवडून आले. पांडुरंग टिंगरे यांचा अपवाद वगळता कै. भारत नाना भालके यांनी देखील विजयाची सत्यता राखत त्यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ही परंपरा राखण्याची काम आज आमदार समाधान दादा अवताडे यांनी  केल्याचे दिसून येत आहे.      आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या चार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी प्रचंड असे विकास कामे खेचून आणलेले आहेत आणि या विकास कामाला गती देण्याचे काम देखील त्यांनी केलेले आहे तीन हजार कोटी रुपयांचे कामे त्यांनी आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये आणून सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत सुविधा सुख सुविधा त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्याचा विकास ...

अभिजित आबानी तीस वर्षाची राजकीय मक्तेदारी संपुष्टात आणली......

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी..... माढा विधानसभा मतदार संघामधून 2024 निवडणुकीमध्ये अभिजीत आबा पाटील यांनी तीस हजार 204 मतदान मिळवून विजय प्राप्त केला.      माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये बबनदादा शिंदे यांची गेली 30 वर्षापासून असलेली राजकीय मक्तेदारी आज रोजी संपुष्टात आली. बबन दादा माढा विधानसभा मधून त्यांनी केलेल्या विकास कामाची ही सर्वसामान्य जनतेला नीट समजावून सांगू शकले नाही. राजकारणामध्ये जनसंपर्क हा कायमस्वरूपी राजकीय नेत्यांनी ठेवायला हवा होता तो जनसंपर्क बबन दादा शिंदे यांनी न ठेवण्याचे दिसून येते.     माढा तालुक्यामधून विविध विकास कामे त्याचप्रमाणे प्रचार यंत्रणा राबवण्यात देखील कमी पडल्याचे दिसून आले. अभिजीत आबा पाटील यांनी उसाचा दर जाहीर करून आणि काटा हा शेतकऱ्यांनी करून आणायचा त्याप्रमाणे बिल देण्यात येईल असे जाहीर करताच यांनी अभिजीत पाटील हे या माढा विधानसभेला निवडून येणार हे संकेत त्याच वेळी मिळाले होते. संपूर्ण काया पलट करण्याचा अभिजीत आबा पाटील यांनी केलेली घोषणा  याला सर्वसामान्य जनतेने दिलेला मतदान रुपी दुजोरा  हेच या निवडणुकीच्या निकालांमधून...

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी...... पंढरपूर मंगळवेढा विधानसभा च्या निवडणूकी च्या रणधुमाळी काग्रेस,भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रस्तापित राजकीय पक्षाच्या ओढाचढीच्या स्पर्धेत महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा आपल्या पारंपारिक मतदार आणि एकगठ्ठा मतदान म्हणून ओळखला जाणारा मतदार यांच्या पाठींबा वर या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात भाजपा, व अन्य राजकिय पक्षाना डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र सध्या या मतदार संघात दिसून येत आहे.     महादेव जानकराना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या बेधडक, सडेतोड भूमिकेमुळे ओळखला जातो. याच रासपा पक्षाच्या वतीने पंकज देवकते या उमद्या, प्रामाणिक आणि सर्वसामान्याच्या, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुणांच्या न्यायहक्का साठी सातत्याने संघर्ष करणारा तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाते.      पंकज देवकते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी पासून या मतदार संघामधून आपला संपर्क ठेवलेला असल्यामुळे त्यांना या मतदारसंघात वाढता पाठींबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या निवडणूक मधील सर्वच पक्षाचे उमेदवार पंकज देवक...

"तुम सिकंदर हो..... रोने का नहीं "...... खासदार सुप्रिया सुळे.

इमेज
 पंढरपूर.... प्रतिनिधी....     आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा उमेदवार अनिल सावंत यांची निवडणूक प्रचार सभा मंगळवेढा येथे झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे या आपले भाषण सुरु असताना एक मुस्लिम जेष्ट नागरिक डोळयांत पाणी आणून अनावर होऊन बोलत असता त्यांनी आपल्याला व आपल्या मुस्लिम समाजाला या भाजपा सरकारच्या राजवटी मध्ये भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. सद्या राज्यात व देशात अल्पसंख्यांक समुदायाला असुरक्षित वाटू लागले आहे. बटेगे तो कटेगे या घोषणे मुळे राज्यातील या मुस्लिम समुदायाला भीती वाटू लागल्याचे त्यांनी सांगितले. जो एकोपा व सर्वधर्म समभाव हा देशात नांदत होता. बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे मुस्लिम समुदायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असेच या घटनेवरून  आज रोजी दिसून येत होते. सिकंदर नामक मुस्लिम वृद्ध यांनी आपल्याला वाटणारी भीतीही खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांचे भाषण सुरू असताना सांगितले. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या वयोवृद्ध वडीलधारी माणसाला त्या म्हणाले तुम तो सिकंदर हो लढवय्ये हो लढने का डरने का नही  असे सांगून त्यांनी महाराष्ट्रामध्ये...

l"गरीबाचे संसार उध्दवस्त करण्याचे काम भाजपाच्या लोकप्रतिनिधी ने केले आहे "......... भगिरथ भालके

इमेज
 पंढरपूर... प्रतिनिधी...      पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूकीचा प्रचार दौरा शेवटच्या टप्प्यात आलेला असून काँग्रेस आय चे उमेदवार भगीरथ भालके पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून हा प्रचार दौरा होत असून ग्रामीण भागातील प्रचार दौरा आटोपून त्यांनी पंढरपूर शहरांमधील विविध चौक,विविध गल्ली, उपनगरे या भागांमधून त्यांनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे.       पंढरपूर शहरांमधून त्यांना नेहमीप्रमाणेच जनतेमधून प्रतिसाद मिळत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. पंढरपूर शहरातील समस्या पंढरपूर शहरातील गोरगरीब जनतेच्या अडचणी व त्यांच्यावर होणारे अत्याचार अन्याय याविषयी कायमस्वरूपी भालके कुटुंब हे सर्वसामान्य जनतेच्या बरोबर राहिलेले  आहेत.सर्वसामान्य पंढरपूर शहरातील हात गाडी विक्रेते,फेरीवाले त्याचप्रमाणे मंदिराच्या कडेला बसून फुलेहार विकणारे,अष्टगंध विकणारे चुडे विकणारे असे असंख्य छोटे मोठे व्यापारी या व्यापाऱ्यांच्या वर प्रशासनाने या गरीब व्यापाऱ्यांचे फेरीवाल्यांचे विक्रीचे सामान फेकून देऊन त्यांचे नुकसान करून  त्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे काम गेल्या आषा...