l"गरीबाचे संसार उध्दवस्त करण्याचे काम भाजपाच्या लोकप्रतिनिधी ने केले आहे "......... भगिरथ भालके
पंढरपूर... प्रतिनिधी...
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूकीचा प्रचार दौरा शेवटच्या टप्प्यात आलेला असून काँग्रेस आय चे उमेदवार भगीरथ भालके पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून हा प्रचार दौरा होत असून ग्रामीण भागातील प्रचार दौरा आटोपून त्यांनी पंढरपूर शहरांमधील विविध चौक,विविध गल्ली, उपनगरे या भागांमधून त्यांनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे.
पंढरपूर शहरांमधून त्यांना नेहमीप्रमाणेच जनतेमधून प्रतिसाद मिळत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. पंढरपूर शहरातील समस्या पंढरपूर शहरातील गोरगरीब जनतेच्या अडचणी व त्यांच्यावर होणारे अत्याचार अन्याय याविषयी कायमस्वरूपी भालके कुटुंब हे सर्वसामान्य जनतेच्या बरोबर राहिलेले आहेत.सर्वसामान्य पंढरपूर शहरातील हात गाडी विक्रेते,फेरीवाले त्याचप्रमाणे मंदिराच्या कडेला बसून फुलेहार विकणारे,अष्टगंध विकणारे चुडे विकणारे असे असंख्य छोटे मोठे व्यापारी या व्यापाऱ्यांच्या वर प्रशासनाने या गरीब व्यापाऱ्यांचे फेरीवाल्यांचे विक्रीचे सामान फेकून देऊन त्यांचे नुकसान करून त्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे काम गेल्या आषाढी यात्रेच्या वेळी येथील नगरपालिका व प्रशासनाने केलेले होते. या घटनेच्या विरोधात आम्ही तीव्र लढा देऊन पंढरपूर शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना न्याय देण्याचे काम आम्ही केलेले आहे.
आषाढी यात्रेच्या दरम्यान प्रशासन व नगरपालिकेने केलेला हा गोरगरिबावरील अन्याय,फेरीवाल्यांचे संसार उध्वस्त करण्याचे काम हे शहरातील प्रशासन करीत असताना आपले भाजपाचे लोकप्रतिनिधी समाधान आवताडे यांनी या गोरगरीब फेरीवाल्यांचे व पंढरपूर शहरातील या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची कुठली बाजू न घेता त्यांनी या पंढरपूर शहरातील या गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आपण पाहिलेले आहे. अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधीला घरी बसवण्याची वेळ आलेली आहे
पंढरपूर शहरातील झोपडपट्टी त्याचप्रमाणे उपनगरी व पंढरपूर शहरातील सर्वच भागामधील त्याचप्रमाणे स्थानिकांच्या अडीअडचणी समस्या या सोडवण्याकडे पूर्णता लोकप्रतिनिधीने दुर्लक्ष केलेले आहे. अशा लोकप्रतिनिधीला येत्या 20 तारखेला पराभूत करून त्या लोकप्रतिनिधीला धडा शिकवा असे काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांनी आज संत पेठ येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ कॉर्नर सभेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित हजारोंच्या संख्येने लोक समुदाय जमा होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा