भाजी विक्रेताचा मुलगा झाला C.A.

 भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला सीए

पंढरपूर...प्रतिनिधी-

पंढरपूर येथे भाजी विकणाऱ्या विठ्ठल गुंड यांच्या मुलाने अतिशय खडतर परिश्रम घेऊन आपल्या घरच्या गरीब परिस्थितीवर मात करून ऋषिकेश गुंड यांनी वयाच्या 24 व्या वर्षी सीए ची परीक्षा उत्तीर्ण होऊन नावलौकिक मिळवलेला आहे.

    ऋषिकेश याचे वडील विठ्ठल गुंड हे पंढरपूर येथील इसबावी परिसरामध्ये भाजी विकण्याचा उद्योग करतात ऋषिकेश ची आई पिठाची गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह करून संसाराला हातभार लावतात. घरची हालाखीची परिस्थिती ओळखून ऋषिकेश यांनी आपले शिक्षण सुरू ठेवून ते अन्यत्र काम करून शिक्षणाचा खर्च भागवीत असे. ऋषिकेश यांनी आपले दहावीपर्यंत शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे यशवंत विद्यालय पंढरपूर येथे पूर्ण करून पुढील शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील कॉमर्स कॉलेज यामध्ये प्रवेश गुण पुढील शिक्षण पूर्ण केले. या कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान त्यांनी या पदवी काळामध्ये केला. त्यानंतर ऋषिकेश यांनी पुढील शिक्षणासाठी सीए ची परीक्षा देण्यासाठी त्यांनी पुणे शहर गाठले पुणे येथे गेल्यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च खाजगी क्षेत्रामध्ये काम करून भागवीत असे. सी एस सी परीक्षा देतेवेळी त्यांना असंख्य अडचणी आल्या आपल्यासाठी परंतु त्यांनी नडगमगता  सीएससी परीक्षा दिली व त्यामध्ये तो उत्तीर्ण झाला. वयाच्या 24 व्या वर्षी सीए होण्याचा मान त्यांनी आज रोजी मिळवलेला आहे. कमी वयामध्ये सीए झाल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

     ऋषिकेश गुंड याला कै. राजेंद्र गुंड सर, पीएसआय., चुलते तानाजी गुंड व वडील विठ्ठल गुंड व आई यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असे त्यांनी बोलताना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....