"समाधान आवताडे यांनी विजयाची परंपरा राखली"...
पंढरपूर प्रतिनिधी....
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये चुरशीची झालेली ही निवडणूक या निवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी पुन्हा एकदा विजय प्राप्त करत ही विजयाची परंपरा राखली.
आज पर्यंत पंढरपूर तालुक्यामधून जेष्ठ माजी आमदार होऊन गेले. त्या पेकी कै. औदुंबर आण्णा पाटील हे सलग दोन तीन वेळा निवडून आले. त्यानंतर कै. सुधाकरपंत परिचारक हे देखील सलग तीन चार वेळा निवडून आले. पांडुरंग टिंगरे यांचा अपवाद वगळता कै. भारत नाना भालके यांनी देखील विजयाची सत्यता राखत त्यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ही परंपरा राखण्याची काम आज आमदार समाधान दादा अवताडे यांनी केल्याचे दिसून येत आहे.
आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या चार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी प्रचंड असे विकास कामे खेचून आणलेले आहेत आणि या विकास कामाला गती देण्याचे काम देखील त्यांनी केलेले आहे तीन हजार कोटी रुपयांचे कामे त्यांनी आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये आणून सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत सुविधा सुख सुविधा त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्याचा विकास साधण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे या त्यांच्या प्रयत्नामुळेच त्यांनी यंदाची 2024 ची विधानसभेचे निवडणूक ही चांगल्या मताधिक्क्याने 8000 वरील मत घेऊन त्याने आपली विजयाची परंपरा राखलेली आहे.
आमदार समाधान आवताडे यांनी सर्वसामान्य जनतेचे जनतेला दिलेले आश्वासन ते म्हणजे जास्तीच्या हजार कोटीचा निधी आणून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्वच विकास कामे करण्याचा त्यांनी निश्चय व्यक्त केलेला होता ते पूर्ण करतीलच अशी आशा सर्वसामान्य मतदारांना आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या विजयाचा जल्लोष संपूर्णपणे तालुका शहर व ग्रामीण भागांमधून जल्लोषात साजरा होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा