"कै भारतनाना भालके यांची परंपरा मी चालवत आहे." ....मनसे नेते दिलीप बापू धोत्रे


 पंढरपूर ( प्रतिनिधी) भारत भालके यांचे नाव घेऊन राजकारण केले जात आहे.परंतू मी कै भारत भालके यांची परंपरा चालवत आहे.मी एक साधा कार्यकर्ता आहे.कोरोणा काळातील माझे काम संपूर्ण महाराष्ट्र जाणतो आहे.मी लोकांची कामे स्व खर्चाने करीत आहे.कोणतीही सत्ता नसताना कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना मी सर्वसामान्य जनतेची कामे करत आहे.

   सत्ताधारी आमदार कोट्यावधी निधी आणला म्हणून सांगतात मग पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विकास का झाला नाही? .असा प्रश्न दिलीप बापू धोत्रे यांनी आज रांजणी या गावी विचारला.

     आपल्या तालुक्यातील सुशिक्षित तरुण हा नोकरी साठी पुणे , मुंबई कडे जात आहे.आपल्या तालुक्यातील या नेते मंडळीने कुठलाही उद्योग धंदे ,कारखाने आणले नाही.कारण येथील तरुणाला काम मिळाल्यावर या नेत्यांच्या मागेमागे कोण फिरणार? कित्येक वर्षांपासून येथील तरुणांना फसवण्याचे काम या आजी,माजी आमदारांनी केले आहे.

    पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील या तरुणांचा शाप या नेत्यांना लागल्या शिवाय राहणार नाही.आता येथून पुढे मतदार बंधू भगिनींने अशा लोकांना घरचा रस्ता दाखवावा.

     आम्ही मंजूर करुन आणलेली एम आय डी सी या भाजपाच्या आमदारांनी खो घालून घालवली आहे.भाजपाच्या नेत्यांनी विरोध केला आहे.असा आरोप मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी केला.

    या प्रचार सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर नाना कदम, शशीकांत पाटील रांजणी गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....