" रस्तेच काय सर्व विकास कामे जनतेच्या दारात पोहोचवणार '..... आमदार अभिजीत आबा पाटील


 पंढरपूर ( प्रतिनिधी) रस्तेच काय तर माढा विधानसभा मतदार संघातील सर्व गावांमधून  रस्तेच काय तर सर्वच विकास कामे मी जनतेच्या दारापर्यंत पोहोचवणार आहे. असे माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील देशमुख वस्ती चव्हाण वस्ती ते कान्हापुरी या रस्त्याच्या सुधारणा व डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज त्या त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थ व कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

      या रस्त्यांमुळे या परिसरातील शेतकरी विद्यार्थी व्यापारी या सर्वांना लाभ होणार आहे. पाऊस काळाच्या मध्ये या रस्त्यावरून सर्वसामान्य जनतेला जाणे येणे अवघड झालेले होते. तरी पावसाळ्यात होणारी ही दळणवळणाची अडचण दूर होऊन वाहतूक व्यवसाय सुरू होईल. ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात बदल घडवून आणायला हा रस्ता विकासाच्या नव्या टप्प्याची सुरुवात करणार आहे.

     यावेळी आमदार अभिजीत आबा पाटील पुढे बोलत असताना ते म्हणाले माढा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावांमधून विकास कामे हे जातीने लक्ष देऊन केले जाणार आहे. या सर्व विकास कामांचा मी पाठपुरावा सातत्याने करत राहणार आहे. रस्ता हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य जनतेचे जिव्हाळ्याचे सर्व विषय मी सोडवण्यास बांधील आहे असे देखील त्यांनी आपल्या मनोगतामध्ये या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.

     या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मोतीराम गोसावी माजी सरपंच कालिदास चव्हाण,सागर कांबळे, मारुती चव्हाण, हरिदास चव्हाण, विठ्ठल चे संचालक दत्तात्रेय नरसाळे ,बालाजी शिंदे, जीवराज मोरे ,शरद मोरे ,गणेश जाधव, बाळू बैरागी, प्रेम चव्हाण, दयानंद शिंदे ,स्मिता पाटील, माजी सरपंच भारत शिंदे, सोमनाथ शिंदे ,माजी सरपंच मधुकर शिंदे, रशीद देशमुख ,दादा देशमुख यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....