"श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या आशिर्वादाने मी खासदार होणार"..... प्रणिती ताई शिंदे
पंढरपूर ( प्रतिनिधी) आज रामनवमीच्या निमित्ताने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे आय काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे या आपल्या प्रचाराचा नारळ राम नवमीचे औचित्य साधून त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन नामदेव पायरी येथे प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला. यावेळी प्रणिती ताई शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे आशीर्वाद त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या स्वरूपात असलेले जनता जनार्दन यांच्या आशीर्वादाने मी खासदार होणार आणि सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार ,बेरोजगार यांचे प्रश्न सोडवणार सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा जो विकास रखडला आहे. तो विकास पूर्णत्वास नेण्याचे ध्येय माझे असून सोलापूर जिल्ह्याला भेडसवणारा पाणी प्रश्न सोडवणार असून बेरोजगारांच्या हाताला एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे कार्य आहोत. आत्तापर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध तालुक्यामधून माझा गाव भेटीचा दौरा हा सुरू आहे. त्या दौऱ्यामधून मला सर्वसामा...