"माढ्याचा लढा आता सुरू झाला आहे " .... धैर्यशील मोहिते पाटील
पंढरपूर ( प्रतिनिधी) जनतेच्या आग्रहाखातर आम्ही तुतारी हाती घेतली आहे. तमाम मायबाप जनतेच्या पाठबळावर आणि मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वाद च्या बळावर आम्ही आता माढ्याचा लढा लढणार आहोत. आणि या माढ्याच्या लढाई मध्ये आम्ही यशस्वी होऊन दाखवणार आहोत. असे माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज मुलाखतीमध्ये सांगितले.
विरोधकांच्या टीकेला आम्ही यापुढे विधायक विकास कामाच्या माध्यमातून त्यांना उत्तर देणार आहे .माढा लोकसभा मतदार संघा मधून प्रचारासाठी स्टार प्रचारक हे लवकरच येणार असून त्यांच्या सभेचे नियोजन हे लवकरच केले जाणार आहे. असे देखील धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा