" स्वेरी काॕलेजने समाजासमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करुन एक आदर्श निर्माण केला "


 ‌पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर या ठिकाणी असलेले कॉलेज ऑफ इंजिन इंजिनिअरिंग गोपाळपूर यांच्यावतीने अभियंता दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. 

     या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 272 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणारे कॉलेजमधील विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थी व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मुंबईच्या दास ऑफ शोअर लिमिटेडचे लिमिटेडचे सह संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.अशोक खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉ बीपी रोंगे संस्थेची सचिव डॉ. सुरज रोंगे माजी अध्यक्ष माजी अध्यक्ष व विश्वस्त एन एस कागदे,माजी अध्यक्ष व विश्वस्त दादासाहेब रोंगे विश्वस्त बी डी रोंगे स्वेरी च्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर ,उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके इतर विश्वस्त कॅम्पसच्या डॉ.एम.एम पवार उप प्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक वर्ग व तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात 272 ऐच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान करून अमूल्य असे योगदान दिले आहे. सदरचे शिबिर यशस्वी होण्यासाठी स्वेरीतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी आता परिश्रम घेतले त्यांच्या प्रयत्नामुळे रक्तदान शिबिर उत्साहात व शिस्तबद्ध पार पडले . याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक वर्ग तसेच उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक कौतुक केले समाज हितासाठी रक्तदाना सारख्या उपक्रमाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अविनाश मोटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अमोल चौंडे ,विद्यार्थी अधिष्ठाता डॉक्टर महेश मठपती प्राध्यापक वर्ग यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी मोलाची साथ दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....