" अमरजित पाटील पंढरपूर मर्चंट को.ऑप.बॅंकेचे चेअरमनपदी निवड" व्हाइस चेअरमनपदी विजयकुमार परदेशी यांची निवड.
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मर्चंट को.ऑप.बॅंकेचे संस्थापक मंडळातील माजी आमदार कै.औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू व कै.राजाराम औदुंबर पाटील यांचे चिरंजीव अमरजित पाटील यांची आज रोजी 2025/26 या वर्षाकरीता पंढरपूर मर्चंट को.ऑप.बॅंक पंढरपूर या बॅंकेच्या चेअरमनपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच बॅंकेच्या व्हाईस चेअरमन पदी विजयकुमार परदेशी यांची निवड करण्यात आली.या निवडीच्या कार्यक्रम प्रसंगी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी सहाय्यक निबंधक योगिता मुरडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
चेअरमन पदी निवड झाल्यानंतर नूतन चेअरमन अमरजित पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त होत असता ते त्यांनी बॅंकेचे सर्व संचालक मंडळ,बॅंकेचे सभासद,खातेदार,ठेवीदार व हितचिंतकांचे आभार व्यक्त केले.बॅंकेचे सर्व संचालक मंडळ, खातेदार, ठेवीदार सभासद यांच्या विश्वासाला पात्र राहून बॅंकेच्या प्रगती साठी प्रयत्न केले जाईल.असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
यावेळी बॅंकेचे सर्व संचालक मंडळातील गत वर्षातील चेअरमन शितल तंबोली,व्हाइस चेअरमन शिखरे माजी चेअरमन नागेश काका भोसले,माजी चेअरमन सोमनाथ काका डोंबे, राजेंद्र फडे मॅनेजमेंट कमेटीच्या चेअरमन सौ.भोसले व अन्य संचालक मंडळ कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा