" लाडक्या बहिणी आणि रोंगे सरांच्या लाडक्या विद्यार्थीनी साठी नऊ मजली वस्तीगृह उभारून मुलींची राहण्याची सुविधा"...... पालकमंत्री जयकुमार गोरे
पंढरपूर.( प्रतिनिधी) ग्रामीण भागातील बहुजन समाजामधील भावी पिढीला शैक्षणिकदृष्ट्या प्रगत करण्याच्या उद्देशाने रोंगे सर यांनी गोपाळपूर सारख्या माळरानावर तंत्र शिक्षणाची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे बहुजन समाजामधील असंख्य मुलांमध्ये या ठिकाणी उच्च शिक्षणाचा लाभ घेत आहे.
मुलींचे पालक हे आपल्या मुलीला उच्च शिक्षणाची संधी व सुविधा उपलब्ध या ठिकाणी झाल्यामुळे कित्येक पालक हे आपल्या मुलीला उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने या स्वेरी या शिक्षण संकुलामध्ये दाखल करीत आहेत. या ठिकाणी डॉ. बीपी रोंगे सर यांनी मुलींच्या साठी नऊ मजली इमारत उभारून मुलींच्या राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे .त्यामुळे पालक कुठलीही चिंता न करता या ठिकाणी आपल्या मुलीला वस्तीगृह मध्ये ठेवत आहेत. मुलींची राहण्याची सोय झाल्यामुळे या ठिकाणी पाचशे ते सहाशे विद्यार्थिनींची राहण्याची, जेवणाची तसेच चहापाण्याची आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेली हे वसतिगृह डॉ. बीपी रोंगे सर यांनी चालू केल्यामुळे अनेक पालकांच्या मधून समाधान व्यक्त केले जात आहे. असे मनोगत अध्यक्ष स्थानावरून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे बोलत असताना व्यक्त केले.
पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे बोलत असताना ते म्हणाले सामान्य कुटुंबातील चार लोक एकत्र येऊन आपल्या ग्रामीण भागामधील मुला-मुलींची उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करून डॉ. बीपी रोंगे सर व त्यांचे अन्य सहकारी मंडळींनी व प्राध्यापक व कर्मचारी यांच्या सहकार्याने आजही एवढी मोठी इमारत व त्या इमारतीमधून ज्ञानदानाचे कार्य आज होत असताना दिसत आहे. बीपी रोंगे सरांच्या या शैक्षणिक संकुलाला यापुढे कुठलीही मदत लागली किंवा त्यांच्या उपक्रमास काही सहकार्याची गरज लागल्यास मी देण्यास तयार आहे. सर्वतोपरी मदत करण्यास मी तयार आहे .असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आश्वासन दिले. आणि डॉ. बीपी रोंगे सर यांच्या स्वेरी या उच्च तंत्र शिक्षण महाविद्यालयाला भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास उपस्थित पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे, सांगोला तालुक्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील, माजी विधान परिषद आमदार प्रशांतराव परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा