"मनाच्या अस्वस्थते मधूनच नावीन्यपूर्ण उद्दिष्ट साकारले जात असते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉ. बी.पी रोंगे सर"...... उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील.
पंढरपूर ( प्रतिनिधी) डॉ. बीपी रोंगे सर हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने आपले उच्च शिक्षण मुंबई या ठिकाणी पूर्ण केल्यानंतर त्यांनी सोलापूर येथील वालचंद इंजीनियरिंग कॉलेज या ठिकाणी नोकरी करत असतानाच त्यांचे मन सर्वसामान्यांच्या मुला मुलींसाठी काहीतरी तंत्रशिक्षणामध्ये भव्य दिव्य उच्च शिक्षणाची संशोधनाची सोय व्हावी या उद्देशाने त्यांचे मन अस्वस्थ व्हायचे या मनाच्या अस्वस्थते ते मधूनच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वेरी या उच्च तंत्रज्ञान शिक्षण संकुलामध्ये उच्च शिक्षणाच्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिले आहेत या शैक्षणिक संकुलामध्ये डिप्लोमा इंजीनियरिंग फार्मसी एमबीए तसेच लॉ कॉलेज अशा अनेक व्यावसायिक शिक्षणाला चालना देण्याचे काम या शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजामधील असंख्य मुलं मुली हे विविध कंपन्या मधून कामाला लागतील आणि पुढील पिढीला एक आदर्श निर्माण करून देतील या उद्देशाने डॉक्टर बीपी रोंगे सरांनी हे ज्ञानदानाचे मंदिर उभा केले आहे. असे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज रोजी स्वेरी या महाविद्यालयामध्ये मुलींच्या साठी ९ मजली वस्तीगृह शुभारंभ तसेच क्रीडांगणाचे उद्घाटन या कार्यक्रमाप्रसंगी बोलत असताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. बीपी रोंगे सर यांनी आपल्या या शैक्षणिक संकुलामध्ये इंजिनिअरिंग मधील विविध विभाग त्याचप्रमाणे एमबीए बी फार्मसी डी फार्मसी आणि लॉ कॉलेज या विविध शाखा व संशोधन केंद्र सुरू केल्यामुळे या परिसरातील असंख्य मुला-मुलींना लाभ होत आहे.
या महाविद्यालयांमधून विविध कंपन्यांचे कॅम्पस भरवले जातात त्यामधून असंख्य विद्यार्थी आज वेगवेगळ्या कंपन्या मधून नोकरीस कार्यरत आहेत. कित्येक विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन करून विविध विषयातील पेटंट देखील त्यांनी मिळवलेले आहे. या ज्ञानाच्या विविध दालने रोंगे सर यांनी सुरू करून बहुजन समाजामधील विद्यार्थ्यांना ज्ञानाची द्वार खुले केले आहे.
संशोधन आणि उच्च शिक्षण याला पर्याय नाही. रोंगे सरांनी मुलींच्या साठी वस्तीगृह उभा केल्यामुळे असंख्य मुलींची राहण्याची सोय या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे पालकांची आपल्या मुलीची राहण्याची चिंता ही मिटलेली आहे. मुलांच्यासाठी तीन वस्तीग्रह तसेच मुलींच्या साठी चार वस्तीगृह उभारली असून मुलींच्या 842 कोर्सेस ला शासनाने फी माफी केलेली आहे. पाच लाख मुलींना आपले शिक्षण घेत असतानाच कमवा व शिका या माध्यमातून दोन हजार रुपये मिळवण्याची संधी देखील उपलब्ध करून दिलेली आहे. शैक्षणिक फी माफी दिल्यामुळे अनेक मुली या उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे येत आहे. ही अभिमानाची बाब आहे. असे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या भाषणांमधून आपले मनोगत व्यक्त केले.
या उद्घाटन व शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित म्हणून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे, माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील, सांगोला तालुक्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी विधान परिषद आमदार प्रशांतराव परिचारक, वसंत नाना देशमुख तसेच असंख्य मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा