"तृतीयपंथींना पंढरपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात कामाची संधी उपलब्ध करून देण्याचे मुख्याधिकारी यांनी दिले आश्वासन"..... भाजपा नेते माऊली हळणवर


 पंढरपूर ( प्रतिनिधी) समाजामध्ये तृतीयपंथी लोकांना कुठेही कामाची संधी मिळत नाही त्याचप्रमाणे त्यांना समाज स्वीकारत नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा या तृतीयपंथी बांधवांना आपले हक्काचे घर मिळावे ,आधार कार्ड मिळावे, रेशनिंग कार्ड मिळावे आणि आपल्या हाताला काम मिळावे. अशी अपेक्षा मनामध्ये घेऊन ही तृतीयपंथी लोक भाजपाचे नेते माऊली हळणवर यांच्याकडे आपली कैफियत मांडल्यानंतर माऊली हळणवर यांनी मध्यंतरी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घडवून दिली त्यावेळी पालकमंत्री यांनी वरील सोयी सुविधा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. याचा पाठपुरावा माऊली हळणवर, तसेच रिपाईचे नेते दीपक आबा चंदनशिवे पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शिरसाट व विक्रम शिरसाट यांच्या प्रयत्नाने आज पंढरपूर नगरपालिका चे मुख्य अधिकारी रोकडे साहेब यांना या तृतीय पंथीयांच्या साठी पंतप्रधान घरकुल योजने मधून घर मिळावे तसेच रेशनिंग कार्ड मिळावे, आधार कार्ड मिळावे, त्याचप्रमाणे बचत गटाच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार मिळावा आणि आपल्या हाताला काम मिळावे अशा मागण्या त्यांनी मुख्याधिकारी रोकडे यांना निवेदन देऊन आपले मनोगत व्यक्त केले. 

    पंढरपूर नगरपालिका चे मुख्याधिकारी रोकडे यांनी शासनाच्या पंतप्रधान घरकुल योजना त्याचप्रमाणे बचत गट च्या माध्यमातून या तृतीयपंथीयांना अर्थसहाय्य केले जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आणि नगरपालिका विभागातील अतिक्रमण विभाग या ठिकाणी या तृतीयपंथीयांना काम करण्याची संधी देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी रोकडे यांनी उपस्थित तृतीयपंथी यांना देण्यात आल्याची माहिती भाजपचे नेते माऊली हळणवर व रिपाईचे नेते दिपक आबा चंदनशिवे, आणि माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....