" तीन देव माणसांच्या मुळे स्वेरी शिक्षण संकुल उभे राहिले".... डॉ.बी.पी.रोंगे सर
पंढरपूर ( प्रतिनिधी). सर्वसामान्य बहुजन समाजातील शेतकरी कुटुंबातील मुला मुलींच्या साठी उच्च तंत्रज्ञान शिक्षण आपल्या पंढरपूर तालुक्या मध्ये मिळायला हवे या विचाराने आम्ही काही प्राध्यापक सहकारी मित्रांनी गोपाळपूरच्या या माळावर स्वेरी या उच्च तंत्रज्ञान अभियांत्रिकी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली या महाविद्यालयाला आम्हाला देव माणसांची भेट झाली. ही देव माणसे म्हणजे कै. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक तसेच माजी तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे सर यांच्या सहकार्यामुळे व मदतीमुळे या अभियांत्रिकी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाला परवानगी मिळवून देण्याच्या कामी माजी तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांनी मोलाचे सहकारी केले.
स्वेरी हे अभियांत्रिकी महाविद्यालय 13000 स्क्वेअर फुटामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू करण्यात आले. 160 विद्यार्थी यांना घेऊन व आठ प्राध्यापकांच्या मदतीने व दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले या लहानशा रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षाच्या झाडांमध्ये रूपांतर झाले आहे. हे सर्व काही माझे सहकारी मित्र प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. असे स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रमुख डॉ.बी.पी.रोंगेसर यांनी आपल्या प्रास्तावित भाषणामध्ये आपले मनोगत व्यक्त केले.
या शैक्षणिक वटवृक्षाच्या वाढीसाठी पालक वर्ग तसेच विद्यार्थी असंख्य कंपन्यांचे आणि स्थानिक आमदार व गोपाळपूर ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. साडेपाच हजार विद्यार्थी संख्या तसेच 300 प्राध्यापक वर्ग आणि अडीचशे शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आज या ठिकाणी कार्यरत आहेत.
आमच्या या महाविद्यालयांमध्ये विविध कंपन्यांचे कॅम्पस भरवले जातात या कॅम्पसच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी आजपर्यंत मोठमोठ्या पदावर नोकरीच लागलेले आहेत. कित्येक विद्यार्थी आयआयटी ला प्रवेश घेतलेला आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी आज अमेरिका इंग्लंड जपान जर्मनी, ऑस्ट्रेलिया या विविध देशांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी बोलण्याचा सराव व्हावा म्हणून आमच्या या महाविद्यालयांमध्ये जातीने लक्ष दिले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही कमी पडता कामा नये . याची काळजी या ठिकाणी घेतले जाते. या स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीच्या विविध शाखा बी फार्मसी डी फार्मसी तसेच एमबीए हे व्यावसायिक शिक्षणाची दालने आम्ही सुरू केले आहेत. यामध्ये व्यवसायिक शिक्षणाची भर म्हणून लॉ कॉलेज हे सुरू केले आहे याचे उद्घाटन तिसरे देव माणूस तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पाटील साहेबांनी आम्हाला सर्वोतोपरी सहकार्य केलेले आहे आणि करत आहेत.
सोलापूर बार्शी रोडवरील असलेले विवेकानंद अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी देखील आम्ही उच्च शिक्षणाची सुविधा व कॅम्पस हे सुरू केलेले आहे यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. या स्वामी विवेकानंद अभियांत्रिकी कॉलेजमध्ये आज असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षणाचा लाभ घेत आहेत.या स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांचे पालक तसेच ग्रामस्थ प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर मंडळीचे सहकार्य लाभत आहे. असे डॉ. बीपी रोंगे सर यांनी आपल्या प्रस्तावित भाषणांमधून आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा