"आमदार अभिजीत आबा पाटील यांचे शरद पवारांनी केले कौतुक "... अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये अभ्यासपूर्ण प्रश्नांनी शरद पवार भारावले.
पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना या कारखान्याचे संचालक मंडळ व धाराशिव साखर कारखाना यांच्या संचालक मंडळांनी दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांगीण विषयावर सखोल चर्चा करण्यात आली ऊस केळी द्राक्ष डाळिंब केळी ए आय संशोधन यावर सविस्तर चर्चा करून पवार साहेबांनी या संचालक मंडळाला मार्गदर्शन केले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माढा तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार अभिजीत आबा पाटील यांच्याशी शरद पवार यांनी व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधला असता माढा तालुक्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार अभिजीत पाटील यांनी केले असंख्य प्रश्न विचारून अभ्यासपूर्ण भाषण अभिजीत आबा पाटील यांनी केल्यामुळे शरद पवार यांनी अभिजीत आबा पाटील यांच्या अभ्यासपूर्ण प्रश्नावली ला दाद देत शरद पवार यांनी अभिजीत आबा पाटील यांचे कौतुक केले.
यावेळी या संचालक मंडळामध्ये असलेले संचालक दिनकर चव्हाण संभाजी भोसले दशरथ जाधव सुरेश भुसे अशोक तोंडले अशोक घाडगे सिताराम गवळी कालिदास साळुंखे दत्तात्रय नरसाळे नवनाथ नाईक नवरे धनंजय काळे साहेबराव नागणे बाळासाहेब हाके जनक भोसले सिद्धेश्वर बंडगर विठ्ठल रणदिवे प्रवीण कोळेकर सचिन वाघाटे सचिन पाटील तानाजी बागल समाधान गाजरे महेश खटके गणेश ननवरे उमेश मोरे धनाजी खरात तसेच धाराशिव चे संचालक संतोष कांबळे भागवत चौगुले सुरेश सावंत संदीप खारे संजय खरात सुभाष शिंदे यांनी भेट घेतली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा