"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"



 पंढरपूर प्रतिनिधी.....

    सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को. ऑफ असोसिएशन सोलापूर च्या वतीने पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेला आदर्श बँक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  दि. पंढरपूर को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँक या बँकेने आजपर्यंत सर्वसामान्य सभासद व ग्राहकांना तत्पर सेवा व बँकिंग क्षेत्रातील सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे व ग्राहकांमध्ये नावलौकिकास पात्र ठरलेल्या या बँकेला आदर्श बँक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

   ठेवी 201 ते 500 कोटी पर्यंत विभाग यामध्ये  दि. पंढरपूर को-ऑपरेटिव मर्चंट बँक या बँकेला तृतीय क्रमांक मिळाला असून या दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेला आदर्श बँक हा पुरस्कार दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई चे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा यांच्या शुभहस्ते  प्रदान करण्यात आला.

    याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख तसेच दि. पंढरपूर को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले माजी चेअरमन सोमनाथ डोंबे संचालक विजयकुमार परदेशी बँकेचे अध्यक्ष शितल तंबोली, उपाध्यक्ष वसंत शिखरे, राजेंद्र फडे, संजय जवंजाळ, भगिरथ म्हमाणे,सौ. मंजुश्री भोसले,तज्ञ संचालक सुनील मोहिते. पंढरपूर मर्चंट को ऑपरेटिव्ह  बँकेचे व्यवस्थापक अतुल म्हमाणे ,सह.व्यवस्थापक रमेश कुलकर्णी.. आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....