छ.शिवाजी महाराज चौक येथे खूनी हल्ला वहातुक पोलिस नदाफ,आणि खटकाळे याच्या साहसाचे कौतुक.
पंढरपूर प्रतिनिधी..
पंढरपूर शहरातील छ.शिवाजी चौक परिसरामध्ये आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कोयत्याने हल्ला करुन सुभाष निमकर नावाच्या इसमाला जख्मी करण्यात आले.जुन्या भाडंणाच्या कारणावरुन दाळे गल्ली येथील रहिवासी अमित वाठारकर यानी हा हल्ला करुन सुभाष निमकर याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर दुखापत केली.सदर घटना घडत असताना छ.शिवाजी महाराज चौक येथे कार्यरत असलेले वहातुक पोलीस नदाफ आणि खटकळे यानी धावत जाऊन हल्लेखाराला त्वरीत जेरबंध केले.वाहतुक पोलीसानी तत्परता दाखवल्याने जखमीचे प्राण वाचले.
हल्लेखोर अमित वाठारकर हल्ला करीत असताना वाहतुक पोलिस हल्लेखोराला पकडण्यासाठी प्रयत्न करीत असताना जमलेल्या लोकाना आरोपीस पकडण्यासाठी मदतीस या म्हणत असताना जमलेल्या लोकानी फक्त बघ्याची भुमिका घेतली.कोणीही पुढे सरसावला नाही.अशा घटना प्रसंगी सर्वसामान्य लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात हे सिद्ध झाले.
वहातुक पोलीसानी त्वरीत जखमी निमकर याला पुढील उपचारासाठी रवाना केले.
पंढरपूर शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण होते की काय अशी शंका जनतेच्या मनात निर्माण होत आहे.वहातुक पोलीस नदाफ व खटकाळे याचे शहरात कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा