"पंढरपूर मर्चट बँक कुर्डूवाडी शाखा येथे एटीएमची सुविधा उपलब्ध ".... व्यवस्थापक अतुल म्हमाणे.
पंढरपूर प्रतिनिधी.....
सोलापूर जिल्ह्यातील व्यापारी बँक म्हणून ओळखले जाणारी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक या बँकेच्या कुर्डूवाडी येथील शाखेमध्ये आज रोजी दिनांक 30 जानेवारी 2025 या दिवशी शुभ मुहूर्तावर पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन शितल तंबोली यांच्या शुभहस्ते एटीएमची सुविधा सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेचे सर्व व्यवस्थापक अतुल म्हमाने यांनी दिली.
पंढरपूर को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँकेच्या अन्य शाखेप्रमाणे कुर्डूवाडी येथील पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या येथे एटीएम ची सुविधा आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. तत्पर सेवा देणारी बँक म्हणून ओळखली जाणारी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक आता कुर्डूवाडी येथे एटीएमची सुविधा देऊन ग्राहक व खातेदारांच्या सेवेसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या एटीएम मशीनची पूजा चेअरमन शितल तंबोली यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी उपस्थित पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे सर्व व्यवस्थापक अतुल म्हमाने,रमेश कुलकर्णी साहेब,EDP मॅनेजर मोहनराव मोहिते कुर्डवाडी शाखेचे शाखा अधिकारी अरविंद चव्हाण व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा