"शिवशंभो नगर फलकाचे अनावरण मा.उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले याच्या हस्ते"
पंढरपूर प्रतिनिधी..पंढरपूर शहरा लगत असलेले एम.एस.ई.बी.जवळ असलेल्या उपनगरा मध्ये शिवशंभो नगर म्हणून ओळखले जाणारे नगर या नगराचे नामकरण फलकाचे अनावरण पंढरपूर शहरातील लोकप्रिय उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले याच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित संतोष कवडे, सुमीत शिदे,तात्या जगताप,देवमारे मेबर,माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे, सतीश काळे,रमेश काळे,रोहीत काळे,व या परिसरातील रहिवासी उपस्थित होते.
या उद्घाटन प्रसंगी नागेश काका भोसले आपल्या मनोगता मध्ये ते म्हणाले पंढरपूर शहरातील उपनगरामधून मुलभूत नागरी सुविधा युद्ध पातळीवर उपल्बद्ध करुन दिल्या जात आहे.या एम.एस.ई.बी मागील देवकते नगरा लगत असले्या या शिवशंभो नगरामध्ये देखील ड्रेनेज लाईन,पिण्याचे पाणीची पाईप लाईन हे टाकून झाले आहे.ते लवकरच सुरु होणार आहे.या भागातील दिवबत्तीची अडचण आहे.ती सोडवली जाईल.व याभागामध्ये रस्त्यावरील दिवे सुरु केले जातील असे आश्वासन त्यानी यावेळी त्यानी आपल्या मनोगता मधून व्यकत केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा