"राक्षसी वृत्ती विरुद्ध माणुसकीचा हा जन आक्रोश लढा आहे "आमदार अभिजित आबा पाटील.
पंढरपूर प्रतिनिधी...
बीड जिल्ह्यातील मस्साजोगी येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या ही मानवतेला लाजवणारी घटना असून या राक्षसी प्रवृत्तीच्या विरोधात माणुसकीचा हा जन आक्रोश लढा आहे असे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी आज पंढरपूर येथे आयोजित जन आक्रोश आंदोलनाच्या सभे स्थानी ते बोलत असताना म्हणाले.
या जन आक्रोश मोर्चामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमधील धनगर समाजाचे तसेच दलित नेते व ओबीसी नेते हे या जन आक्रोश मोर्चामध्ये सामील झाले होते. या जनअक्रोश सभेच्या ठिकाणी वसंत नाना देशमुख,डॉ. प्रणिती ताई भालके, संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख, धनंजय देशमुख, किरण भोसले, सुधीर भोसले, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,माजी नगरसेवक आदित्य फतेपुरकर, महेश पवार, आरपीआय नेते सचिन खरात, दीपक वाडदेकर, किरण घाडगे संतोष कवडे तसेच विविध सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते व नेते मंडळी उपस्थित होते.
यावेळी आमदार अभिजीत आबा पाटील पुढे बोलत असता म्हणाले विधानसभेमध्ये आमदार सुरेश धस यांनी ज्यावेळी हात्येचे विस्तृत वर्णन केले त्यावेळी संपूर्ण सभागृह हादरून गेले होते.अशा प्रकारची घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे हे धक्कादायक आहे. मारेकऱ्यांना अतिशय कठोरातील कठोर शिक्षा ही लवकरात लवकर व्हावी अशी मागणी आम्ही सभागृहात केली. ज्याप्रमाणे बदलापूर येथील कन्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जी शिक्षा दिली, तशी शिक्षा या प्रकरणी देखील का होऊ नये असे देखील सर्वसामान्यांना वाटत आहे. त्वरित शिक्षा केल्यामुळे गुन्हेगारावर एक प्रकारचे जरब बसेल. अशा घटना पुन्हा घडणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी.
परभणी येथे देखील माणुसकीला लाजवणारी घटना घडली. त्यामध्ये सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी सारख्या निष्पाप तरुणाचा पोलिसाच्या मारहाणी मुळे न्यायालयीन कोठडी मध्ये मृत्यू होतो. या सर्व घटना या धक्कादायक आहेत व माणुसकीला काळीमा फासणारे आहेत. आरोपी कोणत्या जातीचे आहेत,कोणत्या समाजाचे आहेत ही गोष्ट महत्त्वाची नसून अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. म्हणून शासनाने त्वरित न्याय देण्यात चे काम करावे.आत्तापर्यंत जे काही पुरावे सापडले आहेत त्या पुराव्याचे जतन करून व तपास योग्य त्या पद्धतीने करून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी. असा राक्षसी प्रवृत्तीच्या विरुद्ध आज माणुसकीचा व मानवतेचा लढा देण्यासाठी हा जन आक्रोश आहे. याची दखल शासनाने घ्यावी देशमुख कुटुंब व सूर्यवंशी कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व समाज बांधव एकजुटीने उभे राहू असे माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी आज जनाक्रोश मोर्चाच्या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा