नारायण चिंचोली येथे सूर्यनारायणाची उत्सवाची यात्रा सुरू


 नारायण चिंचोली येथील ग्रामदैवत सूर्यनारायण देव यात्रा उत्सव सुरू 

पंढरपूर प्रतिनिधी-पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील ग्रामदैवत असलेल्या सूर्यनारायण देवाची यात्रा मोठ्या उत्साह सुरू झाली असून ही यात्रा 31 डिसेंबर पासून सुरू असून ही यात्रा पुढे संपूर्ण महिनाभर 28 जानेवारीपर्यंत महिनाभर सुरू असते .परंतु यात्रेचा कालावधी हा रथ सप्तमी पर्यंत असल्याचे पुजारी गणेश अवताडे यांनी सांगितले .

पंढरपूर - सोलापूर -रोडवर अवघ्या दहा किलोमीटर वर असणाऱ्या नारायण चिंचोली येथे पुरातन हेमाडपंथी    सूर्यनारायणाचे मंदिर असून हे मंदिर अति प्राचीन असून हे मंदिर अत्यंत दुर्मिळ व कोरीव बांधकाम असलेले महाराष्ट्रातील एकमेव असे मंदिर आहे . नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देव यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक पौष महिन्यामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात .आलेल्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा करण्यात आली असल्याची माहिती नारायण चिंचोली चे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती सरपंच नर्मदा लक्ष्मण धनवडे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा नारायण चिंचोली चे माजी सरपंच लक्ष्मण धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण यांनी दिली. 

नारायण चिंचोली येथे संपूर्ण राज्यातून हजारो भाविक येत असतात या भाविकांना मूलभूत सुविधांसह सुलभ दर्शनाची सोय करण्यात आले असल्याची माहिती सूर्यनारायण देव ट्रस्टचे अध्यक्ष विजय कोळेकर यांनी दिली. नारायण चिंचोली येथे महाराष्ट्रातील एकमेव असे पुरातन सूर्यनारायण देवाचे मंदिर असून विशेषतः रविवारी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते . महिन्यातील 14 जानेवारी रोजी मकर संक्रमणाचा काळ असून यावेळी सूर्याची उगवते किरणे मूर्ती वरती पडतात. हा उत्सव पाहण्यासाठी तालुक्यात जिल्ह्यातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तरी पंचक्रोशीसह तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आव्हान ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने व सूर्यनारायण देव ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. ही यात्रा पार पाडण्यासाठी सूर्यनारायण देव ट्रस्ट संचालक मंडळ, ग्रामपंचायत प्रशासन, विविध सामाजिक संघटना . मोठ्या उत्साहाने पार पाडत असतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....