"सर्व कल्याणकारी योजना राबवण्याचे काम मी पूर्ण करणार "........... समाधान आवताडे


 पंढरपूर... प्रतिनिधी....

     महायुतीच्या सरकारने जाहीर केलेल्या सर्व योजना राबवण्याचे काम येत्या काळात मी पूर्ण करणार आहे. या सर्व योजनेचा लाभ तळागाळतील सर्व जनतेला होणार आहे. त्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार आले पाहिजे. असे आपल्या प्रचार सभेच्या दौरा धर्मगाव येथील आयोजित कार्यक्रम मध्ये आमदार समाधान दादा आवताडे व्यक्त केले.

    टेंबू पाणी योजनेतील पाणी आपल्या मतदारसंघातील शेवटच्या गावा पर्यंत आणण्याचे काम पूर्ण होत आले आहे. टेंबूचे पाणी आपल्या तालुक्यात येऊ शकणार नाही. असे विरोधक म्हणत होते परंतु या महायुतीचे सरकार च्या माध्यमातून हे पाणी आता माण नदीमधून आपल्याला आणता येणार आहे. उन्हाळ्यात या भागातील पीकाना पुरसे पाणी मिळत नव्हते परंतु आता या भागातील पीके जळून जाणार नाहीत.

     महायुती च्या सरकारने जनतेच्या साठी कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी लाडकी बहिण योजना, मुलींना मोफत शिक्षण, पाष्सठ वयावरील महिलांना वयोश्री योजना लागू करण्यात येणार आहे. आजारपणातील खर्च शासन करणार आहे. 

    शेतकर्याचे वीज बील माफ करण्यात आले आहे. येत्या काळात शेतकर्राचे कर्ज माफ केले जाणार आहे. ज्या प्रमाणे मला मिळालेल्या आमदारकीच्या काळात मी या मतदारसंघातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी व विविध समाजोपयोगी कामासाठी तीन हजार कोटींचा निधी आणून मतदारसंघातील रस्ते, समाजमंदीर, संविधान भवन, मराठा भवन ग्रामपंचायत च्या इमारती साठी निधी देण्यात आला आहे. अशाअनेक योजना पूर्ण करण्याचे काम आम्ही या महायुतीच्या काळात केलेले आहे़. आपल्या गावाचा, शहराचा विकास करायचा असेल तर येत्या वीस तारखेला पुन्हा एकदा मला काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन आमदार समाधान दादा आवताडे यांनी या धरमगाव येथील जनतेला केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....