"राजकारणाचा काहीही संबध नसणार्याला आमदार व्हावं वाटू लागलय"......... शिवाजीराव कांबळे
पंढरपूर.. प्रतिनिधी.......
माढा विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्या पासून अनेकांना आमदार व्हावंस वाटू लागलं. त्यामधील एक पंढरपूर चा उमेदवार ज्याला साधे ग्रामपंचायत सदस्य होता आले नाही की जिल्हा परिषद सदस्य होता आले नाही. राजकारणाचा काहीच गंध नसलेल्या या उमेदवाराला आमदार व्हावस वाटू लागलं असे माढा तालुक्यातील तुळशी या गावी प्रचार सभेत जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याणचे सभापती शिवाजीराव कांबळे यानी म्हटले.
गेली तीस वर्षे माढा तालुक्यातील जनतेच्या कल्याणासाठी झटणारे बबनदादा शिंदे यांनी सीना सिंचन योजनेतून संपूर्ण माढा तालुका ओलिता खाली आणण्याचे काम करत आले आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा माढा तालुका हिरवागार केला.
माढा तालुक्यातील काही गावे तुळशी, अजंनगाव खे,परितेवाडी ही दूर असल्यामुळे या भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करीत आहेत. या भागात तलाव निर्माण करून त्यामध्ये पाणी साठवण हे पाईप लाईन च्या माध्यमातून पाणी आणले जाणार आहे. या कामाची मंजूरी मिळाली असून येत्या काळात येथील पाणी प्रश्न मिटवला जाणार आहे.
बबनदादा यांनी केलेल्या विकास कामाला पुढे नेण्याचे काम रणजित शिंदे हे करणार आहेत. एक उच्च शिक्षित इजिनिअर अभ्यासू उमेदवार आपल्याला लाभला आहे. रणजित शिंदे यांनी आपली राजकिय सुरवात ग्रामपंचायत पासून सुरु करून जिल्हा परिषद सदस्य, दुध संघ, आदी सर्वसामान्य जनतेचे कल्याणकारी योजना या अमलात आणल्या जातात. अशा विविध पदावर काम करुन जनतेच्या तसेच तालुक्याचा विकास कामे पूर्ण करण्याचे कामाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे या युवकाला या विधानसभेला संधी दिली जावी. रणजित शिंदे यांचे चिन्ह सफरचंद आहे. या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन शिवाजीराव काबळे यांनी केले.
1995 साली बबनदादा शिंदे यांना असाच त्रास उमेदवारी मिळवताना झाला होता. त्यावेळी छत्री हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवली व बबनदादा विजयी झाले. तशीच राजकीय परिस्थिती आता देखील निर्माण झाली आहे. रणजित शिंदे यांना सफरचंद हे चिन्ह मिळाले आहे. यंदाही या सफरचंद चिन्हावर ते मताधिक्याने विजयी होणार आहेत. असे शिवाजीराव कांबळे यांनी आपल्या प्रचार सभेतील भाषणामधून आपले मनोगत व्यक्त केले मतदार उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा