"आज पर्यंत झालेल्या आमदारांच्या कामाचा बॅकलॉग मी भरून काढत आहे ......... आमदार समाधान आवताडे.


 पंढरपूर.. प्रतिनिधी..

      आज पर्यंत मंगळवेढा तालुक्याला असंख्य आमदार खासदार झालेले आहेत परंतु या आमदार खासदारांनी आपल्या या मंगळवेढा शहराकडे व तालुक्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले असल्या मुळे आपल्या मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न असो बेरोजगारी असो किंवा रस्त्याच्या बाबतीतले असलेल्या तक्रारी असो अशा असंख्य अडचणी व समस्या व तक्रारी यांचे निराकरण करण्याचे काम आज पर्यंत झालेल्या आमदार खासदारांनी केलेले नाही. या मागील झालेल्या आमदार खासदारांच्या कामाचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम मी आज करीत आहे असे आज कचरेवाडी येथे भाजपाचे उमेदवार समाधान दादा अवताडे यांनी आज रोजी ग्रामस्थांच्या समोर प्रचार सभेमध्ये बोलताना ते म्हणाले.

    यावेळी कचरेवाडी येथील असं की कार्यकर्ते व मान्यवर यांची उपस्थिती होती.

       भाजपाचे उमेदवार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या भाषणामध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले की गेल्या पोट निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने मला भरघोस मताने निवडून दिले. त्यामुळे मला चार वर्षांमधील फक्त दोन वर्षे काम करण्यासाठी मिळालेले आहेत.दोन वर्षे ही कोरोनाच्या कालावधीमध्ये गेल्यामुळे मला काहीच कार्य  करता आलेले नाही. मला मिळालेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मी 3000 कोटी रुपयांचा निधी या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामाच्या कामासाठी आणलेले आहेत.

     या कचरेवाडी गावाकडे येणारा रस्ता हा पूर्वी अतिशय नादुरुस्त व खडबडीत होता. या रस्त्यासाठी आम्ही अडीच कोटीचा निधी मंजूर केला आणि त्याचे काम देखील पूर्णत्वास आणलेले आहे. असे समाधान अवताडे यांनी आपल्या प्रचार सभेतील भाषणामध्ये म्हणाले.

    पूर्वी या मंगळवेढा तालुक्याचे आमदार बारीक सरीक गाव व वाड्यावस्ती त्यावरील लोकांना म्हणायचे की हा आपला कार्यकर्ता आहे का हा आपला मतदार आहे का अशी चौकशी करून मगच त्या गावाचा त्या वाडी वस्तीचा विकास केला जायचा परंतु ही पद्धत मी आमदार झाल्यापासून मोडीत काढलेली आहे.माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक वाडी वस्ती बारीक गाव असो त्या प्रत्येक गावातील रस्ते असो असंख्य अडचणी असो पाण्याचा प्रश्न असो काही असो या प्रश्नासाठी मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे.आणि प्रत्येक गावातील लोकांना मी सांगितलेले आहे की तुम्ही 😭फक्त माझ्याकडे काम घेऊन या आणि काम करून घ्या. मी कधीही मंगळवेढा किंवा पंढरपूर तालुक्यातील कुठल्याही गाव वाडी वस्ती या भागामध्ये विकास कामासाठी मी दुजाभाव केलेला नाही. मी फक्त विकास कामासाठी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच लोकप्रतिनिधी झालेला आहे. असे समाधान अवताडे यांनी आपल्या कचरेवाडी येथील प्रचार सभेमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....