"मी एकादे काम करायचे ठरवले तर ते काम पूर्ण केल्याशिवाय रहात नाही ". खासदार मंत्री नितीन गडकरी.


 पंढरपूर.. प्रतिनिधी......

     गेल्या काही वर्षापूर्वी देशामध्ये सर्व सुविधा उपल्ब्ध असताना देशातील रस्त्याची अवस्था दयनिय होती. अटलबिहारी बाजपेयी पंतप्रधान असताना. त्यांनी देशातील रस्त्याची काळजी व्यक्त केली होती. सर्व शहराना गाव खेड्या चे रस्ते ही जोडली जाण़्यासाठी एक योजना तयार करण्याचे काम माझ्यावर सोपवले. तीन महिने अथक काम करून ही योजना तयार केली. आज संपूर्ण देशातील रस्ते हे शहर गाव, खेडी, वाड्यावस्ती पर्यंत मजबूत आणि टिकाऊ रस्ते पंतप्रधान सडक योजना या योजनेच्या माध्यमातून निर्माण झाले आहेत.

     देशातील शेतकर्यानी पिकवलेले धान्य, फळे भाजीपाला हा जलदगतीने शहरापर्यत पोहचत आहे. याचा लाभ शेतकरी, व्यापारी, वाहतुकदाराना होत आहे. भाजपा सरकारने ऊस, मका, अन्य फळफळाव यांच्या पासून इथेनाईल बनवण्या साठी परवानगी देण्यात आली आहे. याचा वापर पेट्रोल च्या ऐवजी इथेनाईलचा वापर केल्यास अत्यंत स्वस्तात उपलब्ध होणार आहे. वीस रुपये लिटर ने ते ग्राहकांना मिळणार आहे.

     या पुढील काळात देशातील मोटार उद्योजक टाटा, महिन्द्रा, बजाज, व अन्य मोटार कंपनी या इथेनाइलचा वापर करणार आहेत. आणि आपल्या देशातील या कंपनी आपल्या कारखान्यात या मोटारीचे उत्पादन सुरु झाले आहे. त्याचा लाभ हा देशातील जनतेला होणार आहे.

    देशातील शेतकऱ्यांना या इथेनाइल उत्पादनामुळे आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे. असे सडकनिर्माण मंत्री नितीन गडकरी यांनी आज मंगळवेढा येथे भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचार सभेला आल्यानंतर ते मतदारांना संबोधीत करताना म्हणाले.

    आपल्या भाषणात पुढे बोलत असता ते म्हणाले आमदार समाधान आवताडे यांना मिळालेल्या मोजक्या कारकीर्द मध्ये त्यांनी हजारो कोटीचे विकास काम केली आहेत. या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचा कायापालट करण्याचे काम समाधान आवताडे व प्रशांत परिचारक हे करीत आहेत. त्यांना येथील मतदारांनी साथ द्यावी. या भागातील विकासकामे ते दोघे पूर्णत्वाला नेतील. येत्या वीस तारखेला भाजपाला मतदान करुन समाधान आवताडे यांना विजयी करा असे आवाहन नितीन गडकरी यांनी जनतेला केले.

    या वेळी उपस्थित नेतेमंडळी व कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....