"काँग्रेसचा उमेदवार आम्हाला साधे देखील विचारत नाही".... अमोल सूर्यवंशी काँग्रेस पंढरपूर शहराध्यक्ष
पंढरपूर... प्रतिनिधी....
आज पुन्हा देखील भालकी गटातील कार्यकर्ते कार्यकर्ते व शहराध्यक्ष हे काँग्रेसचे उमेदवार हे आम्हाला विचारत देखील नाहीत व आम्हाला हा उमेदवार पसंत नाही हे कारण पुढे करीत पंढरपूर शहरातील काँग्रेस शहराध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे अनिल सावंत यांना आपला पाठिंबा दर्शविलेला आहे.
आज रोजी पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे पंढरपूर शहर अध्यक्ष अमोल सूर्यवंशी व असंख्य कार्यकर्ते यांनी आज रोजी शरद पवार पक्षाची उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा दर्शवीत त्यांनी आणि सावंत यांना निवडून देण्याचे जाहीर केले आहे.
दोन दिवसांपूर्वीच भालके गटातील माजी नगराध्यक्ष उज्वला भालेराव व महादेव धोत्रे व काँग्रेसचे नगरसेवक लखन चौगुले हे व त्यांचे असंख्य कार्यकर्ते हे भाजपामध्ये प्रवेश करून त्यांनी आपली नाराजी व्यक्त करीत प्रवेश केला आहे भाजपा पक्ष आम्हाला न्याय देईल व आमचे प्रभागातील कामे करतील असे म्हणून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला होता. या गोष्टीला दोन दिवस होतात न होतात तोच काँग्रेस पक्षामधील देखील काही कार्यकर्ते व शहराध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार भालके यांना पाठिंबा न देता त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करीत त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांनी त्यांनी पाठिंबा दर्शविलेला आहे.. त्यामुळे भालके गटांमध्ये खळबळ उडाली आहे.
या घडामोडी बाबत शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी आपल्या मुलाखतीमध्ये त्याने म्हटले आहे ही पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पारंपारिक मतदार संघ असून महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत हेच अधिकृत उमेदवार असून असे जयंत पाटील यांनी देखील घोषित केलेले आहे या मतदारसंघांमध्ये कोणाची ताकद किती आहे हे महत्त्वाचे नसून आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून एकत्रपणे लढण्याची आम्ही ठरवलेले आहे. आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची ही जागा आम्ही जिंकून घेणार आहे. असे आपल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आणि सावंत यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी पंढरपूर युवक शहराध्यक्ष संदीप शिंदे गणेश माने विजय एलटी शहराध्यक्ष गोकुळ माने सोशल मीडिया अध्यक्ष महेश जाधव जिल्हा सचिव पांडुरंग डांगे काँग्रेसचे शहरात शहर उपाध्यक्ष सागर कदम शैलेश घोगरदरे काँग्रेस सरचिटणीस पिंटू जाधव शहर सचिव अनिल माने शहर सचिव सुदीप माने शहर उपाध्यक्ष अण्णा आदरराव किशोर महाराज जाधव आधी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा