स्वच्छ प्रतिमा आणि माळकरी असलेले अनिल सावंत मतदार संघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. संधी द्या परिवर्तन घडेल...... माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले.
पंढरपूर प्रतिनिधी...पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत हे युवकांचे प्रतिनिधित्व करणारे व्यकतीमत्व असून भैरवनाथ शुगर या मंगळवेढा तालुक्यातील साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्याचे दुख जाणतात. मंगळवेढा तालुक्यातील युवकांना रोजगार उपल्ब्ध त्यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून केले आहे.
एक नवीन चेहरा स्वच्छ प्रतिमा आणि माळकरी व्यक्तिमत्व आपल्या मतदार संघाला लाभले आहे. अशा उमद्या नेतृत्वाला जनतेनी संधी द्यायला हवी. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात असल्यामुळे अनिल दादा सावंत हे मोठ्या मताध्याक्याने निवडून येणार आहे. याची खात्री आम्हा कार्यकर्ते व नेतेमंडळी आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात या पूर्वी राष्ट्रवादी शरद पवार यांचाच पक्षाचे उमेदवार भारत भालके हे विजयी झाले होते. शरद पवार यांच्या वर प्रेम करणारा याभागातील मतदार आहे. त्यामुळे अनिल सावंत यांचा विजय निश्चित आहे. असे पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांनी आपल्या मुलाखती मध्ये आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा