महिलांना पन्नास टक्के आरक्षण असूनही उमेदवारी दिली जात नाही...... महिलांना कमी लेखले जाते....परंतु विजय माझाच होणार....मिनलताई साठे
पंढरपूर... प्रतिनिधी
माढा विधानसभा निवडणूक मध्ये माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून विरोधकाचे धाबे दणाणले आहेत. महिलांना अजूनही अबला समजले जात आहे महाराष्ट्र राज्यात राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्या बाई, सावित्रीबाई फुले अशा क्रांतिकारी महिलाचा महाराष्ट्र आहे. महिलांना राजकारणात कमी लेखले जाते. पुरषसत्ताक राजवट अजुनही राबवली जात आहे. मला अन्य पक्षानी उमेदवारी महिला म्हणून नाकारली. परंतु अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काग्रेसने मला उमेदवारी देवून महिलांना न्याय देण्याचा प्रयन्त केला आहे.
माढा विधानसभा मतदार संघात महिला मतदाराची संख्या जास्त आहे. मी आजपर्यंत माढा नगरपालिकेत नगराध्यक्षा म्हणून कार्य करीत असताना आपले घर कुटंब जसे काटकसरीने चालवले जाते तसे कार्य माढा शहरात सुधारणा, सर्वसामान्य जनतेची असंख्य कामे प्रामाणिकपणे केली आहेत. माढा शहरातील जनताच तुम्हाला माझे काम कसे आहे ते सांगतील. जनतेची असंख्य कामे केल्यामुळे ही जनता मला या विधानसभा निवडणूक ला उभे राहण्यासाठी पाठिंबा दिला आहे.
माढा तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी आहे. एक महिला शहर सुधारणा करु शकते मग तालुक्यातील सुधारणा का नाही करणार अशी मनोधारणा येथील मतदारांची आहे. माझ्या उमेदवारी मुळे विरोधकाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
स्वच्छ कारभार तालुक्याचा विकास, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुधारणा, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. माझा विजय निश्चित आहे.
असे माढा विधानसभा मतदार संघातील अजित पवार पक्ष राष्ट्रवादी काग्रेस च्या उमेदवार सौ. मीनलताई साठे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा