"शरद पवार यांच्या निर्णयाची वाट न पहाता वेगळी भुमिका घेणारे भालके यांना यंदा धडा शिकवा".... जयंत पाटील.
पंढरपूर. प्रतिनिधी....
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या उमेदवारीची मागणी प्रसंगी भालके यांनी शरद पवार यांच्या निर्णयाची वाट न पहाता वेगळा निर्णय घेऊन आपली उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर केला. आणि या मैत्रीपूर्ण लढती मध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला असल्यामुळे त्यांनी अनिल सावंत या माळकरी युवकाला उमेदवारी ची संधी दिली गेली. त्यामुळे या मैत्रीपूर्ण लढती मध्ये रंगत निर्माण झाली आहे.
जयंत पाटील यांनी अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले. शरद पवार यांच्या निर्णयाची वाट न पहाणार्या या उमेदवाराला धडा शिकवा असे आज जयंत पाटील यांनी आपल्या पंढरपूर येथील प्रचार सभेत आपली भुमिका माडली.
देशात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. महागाई वाढली आहे. शेतकरी संतप्त आहेत. मात्र या मुलभूत समस्याकडे बघायला भाजपाला वेळ नाही. भाजपा पक्ष फक्त्त जातीजातीत तंटा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. समोर जरी काग्रेसचा उमेदवार असला तरी शरद पवार यांचे आशिर्वाद अनिल सावंत यांना आहे.हे जनतेनी विसरु नये. असे जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाले.
या प्रचार सभेतील आपल्या भाषणात उमेदवार अनिल सावंत म्हणाले की मला कोणावर टीका करायची नाही. एक उमेदवार परिचारक यांच्या भरवशावर उभा आहे. तर दुसरा आपल्या महाविकास आघाडी मधील कधीही फोन न उचलणारा नाटरिचेबल उमेदवार आहे.
या मतदारसंघात तीन हजार कोटींचा निधी आणला आहे असे सांगणारा उमेदवार आहे. या भागातील विकास फक्त कागदावर सांगणारा उमेदवार आहे. या भा्गातील लोकांना रस्ते,पिण्याचे पाणी या समस्येला सामना करावा लागत आहे. अशा निष्क्रिय उमेदवारांना घरी बसवण्यासाठी मला शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे.
मला या निवडणूक मध्धे विजयी करून काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती उमेदवार अनिल सावंत यांनी केली.
या उपस्थित असंख्य कार्यकर्ते व नेते मंडळी व महिला आणि मतदार हे हजारोच्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा