"राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे. " विजय राष्ट्रीय समाज पक्षाचाच होणार आहे........ महादेवराव जानकर.
पंढरपूर.... प्रतिनिधी..
राष्ट्रीय समाज पक्षाचा एक स्वतंत्र असा मतदार वर्ग आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा मोठ्या प्रमाणामध्ये या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मतदार असल्यामुळे उमेदवार पंकज देवकते यांना आम्ही संधी दिलेली आहे. पंकज देवकते यांचा जनसंपर्क या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व त्यांच्या विजयाची खात्री असल्यामुळे आम्ही त्यांनाही उमेदवारी दिलेली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या कडून उमेदवारी मिळावी म्हणून असंख्य लोक इच्छुक होते परंतु या सर्व इच्छुकांनी या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील पंकज देवकते यांना मानणारा मोठा मतदार वर्ग या परिसरात असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी माघारी घेऊन पंकज देवकते यांना पाठिंबा दिला असून या पाठिंबाच्या जीवावरच राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार पंकज देवकते हे मोठ्या मताने निवडून येतील. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार नारळ नामदेव पायरी येथे फोडण्यात आला त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी आज रोजी पत्रकारांना सांगितले.
राष्ट्रीय समाज पक्षाचा एक बेस वोटर या मतदारसंघात आहे निवडणुकीमध्ये या बेस वोटरच्या बळावरच या मतदारसंघांमध्ये आमच्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार आहे. असे यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी आज सांगितले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रचार फेरीमध्ये उपस्थित प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते मुख्य महासचिव न्यानेश्वर माऊली सलगर युवक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी जिल्हा कोषाध्यक्ष माळप्पा खांडेकर सरचिटणीस अनिल शेंडगे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष ओंकार घोडके जिल्हा संपर्कप्रमुख नितीन मेटकरी जिल्हा कार्यकारणी सदस्य अनिल हेगडे कर मंगळवेढा तालुकाध्यक्ष संजय वाघमोडे मंगळवेढा युवक तालुकाध्यक्ष वैभव गडदे उचेटाण ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब गडदे संजय लवटे जिल्हा कार्यकारणी सदस्य अरुण चौगुले, आदित्य फतेपुरकर प्रशांत घोडके प्रसाद कोळेकर अजय देशमुख विठ्ठल माने भजनदास गावडे संजय माने विक्रम तरंगे सुरज खरात अण्णासाहेब देशमुख नागेश काळे महादेव खांडेकर चैतन्य मिटकरी वासुदेव हजारे व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा