"अनिल सावंत यांच्या पाठीशी शरद पवारांची ताकद आहे. विजय निश्चित आहे "....... खासदार अमोल कोल्हे
पंढरपूर. प्रतिनिधी......
आज सकाळी अनिल सावंत यांच्या निवास स्थानी झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये बोलत असताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की या मतदार संघात नकारात्मक अफवा पसरवल्या जात आहे. कुणीकुणाच्या मागे जाणार नाही. काही लोक विविध पक्ष फिरुन आले आहेत. त्याच्या विषयी न बोलले चांगले पवार साहेबांचे पूर्णपणे लक्ष आहे. पवार साहेबाना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणावर येथे आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना मानणारा मतदार या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अनिल सावंत यांचा विजय निश्चित आहे.
महविकास आघाडीने जनकल्याणकारी योजना जाहीर केली आहे. महिलांना मोफत प्रवास, तीन हजार रुपये दरमहा महालक्ष्मी योजने अतर्गत दिले जाणार आहे. जन्मलेल्या कन्येला वयाच्या अठराव्या वर्षी लाख रुपये तीच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंत चे कर्ज माफ केले जाणार आहे. युवकांना दरमहा चार हजार रुपये दिले जाणार आहेत. अशा अनेक कल्याणकारी योजना या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आलेनंतर अमलात आणले जाणार आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
आज पंढरपूर शहरातील काही नगरसेवकानी अनिल सावंत यांना पाठींबा देत खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थित शरदपवार यांच्या पक्षात प्रवेश केला. त्या सर्व नगरसेवकानी अनिल सावंत यांना विजयी करण्याचे अभिवचन दिले.
या पत्रकार परिषदेला उपस्थित मान्यवर कासेगाव चे वसंत ना देशमुख, अमर सुर्यवंशी, अदित्य फतेपूरकर, दिपक वाडदेकर, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, संदिप माडवे, शाम गोगाव, असंख्य कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा