"अभिजित आबा पाटील यांना सावंत परिवाराचा पाठींबा आहे.... प्रा. शिवाजी सावंत यांच्या भूमिकेशी काही घेणे देणे नाही."...... अनिल सावंत
पंढरपूर. प्रतिनिधी....
नुकतेच काही दिवसापूर्वी प्रा. शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या त्यांच्या भूमिकेशी सावंत परिवाराचे काही घेणे देणे नाही. तो त्यांचा व्यक्तीक विषय आहे.
आमचा माढा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित आबा पाटील यांना पाठींबा असून तुतारी हे चिन्ह त्याचे असून तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल दादा सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत आपले मनोगत व्यक्त केले.
माढा मतदार संघ आणि पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात महविकास आघाडीचे कार्यकर्ते मध्धे संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. माढा मतदार संघातील सर्व सावंत परिवाराचे सदस्य तसेच सावंत गटाचे नेते कार्यकर्ते यांनी त्याची भूमिका व्यक्त केली.
प्रा. शिवाजी सावंत हे जरी माझे काका असले तरी त्यांनी दोन दिवसापूर्वी अचानक पणे विरोधी गटाच्या अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला त्यामुळे कार्यकर्ते व नेतेमंडळी आणि मतदार यांच्या मध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो म्हणून आम्ही सांगू इच्छीतो की शिवाजी सावंत यांनी घेतलेली भूमिका ही त्याची व्यकतीक भूमिका आहे. त्याच्या काहीही संबंध नाही. असे आज पत्रकार परिषदेत अनिल सावंत यांनी सांगितलं यावेळी उपस्थित रवि सावंत, विजय सावंत, आणि सावंत परिवारातील सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा