"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......
पंढरपूर... प्रतिनिधी......
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाच्या उमेदवारानी आपले अर्ज दाखल करून प्रचार सभेच्या रणधुमाळी ते सामील झाले आहेत. आय काग्रेस पक्षाचे उमेदवार भगिरथ भालके, भाजपा कडून समाधान आवताडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या वरील विविध पक्षाच्या उमेदवारा सोबत या मतदार संघामधून राष्ट्रीय समता पक्ष या पक्षा च्या वतीने महादेव जानकर यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून पंकज देवकते यांना उमेदवारी देऊन या मतदार संघात पंचरंगी लढत निर्माण केली आहे.
पंकज देवकते या युवकाला उमेदवारी देऊन मताची विभागणी होऊन रासपा चा हा उमेदवार निवडून कसा येऊ शकतो याचा अदाज महादेव जानकर यांनी केला आहे. या मतदार संघातील धनगर समाज हा सायलेंट गेम चेंजर ठरु शकतो. पंकज देवकते या युवकानी बेरोजगार तरुणाच्या साठी अदोलन केले आहे. शेतकर्याच्या शेतीमाला भाव मिळत नाही म्हणून अदोलन केले आहे. दुध दर असो की खताची वारेमाप दरवाढ असो. अशा अनेक जनहितार्थ अदोलनात सहभागी होऊन न्याय हक्कासाठी लढा दिला आहे. याची जाणीव पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील जनतेला आहे.
धनगर समाज आरक्षणा बाबत संवेदनशील झालेला आहे. कुठल्याही सत्ताधारी पक्षानी व विरोधकांनी या धनगर समाजा च्या आरक्षाणा साठी विधानभवनात आवाज उठवला नाही. त्यामुळे नाराज असलेला हा धनगर समाज या निवडणूक मध्ये सायलेंट गेम चेंजर ठरतो की काय अशी परिस्थिती सद्या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात निर्माण झाली आहे. धनगर समाज आरक्षाणा विषयी जागरूक व हळवा झालेला आहे. सर्वच राजकीय पक्षानी नुसते आश्वासनाचे गाजर दाखवले आहे याची नाराजी येत्या वीस तारखेला होणार्या मतदान दिवशी दिसून येऊ शकते.
धनगर समाज या मतदार संघामध्ये लक्षणिय लोकसंख्येने आहे. याची जाणीव सर्व पक्षीय नेतेमंडळीना आहे. याच मतदार संघातील मराठा समाज देखील आरक्षण मागतो आहे. त्या समाजाला देखील सरकारने व सर्व पक्षाने झुलवत ठेवले आहे. त्यामुळे या दोन्ही समाजाशी जवळीक असलेले पंकज देवकते हे या मतदार संघातील प्रस्तापिथ नेते आवताडे, भालके यांना डोकेदुखी ठरणार की काय अशी शंका निर्माण होत आहे. धनगर समाज आणि मराठा समाज यांच्या आरक्षणा बाबत च्या नाराजीचा फटका भालके आवताडे यांना बसणार का अशी चर्चा मतदारांच्या मध्ये सुरु आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा