" विरोधकांना टीका करु द्या आपण विकास कामे करु".... आमदार समाधान दादा अवताडे


 पंढरपूर ( प्रतिनिधी) विरोधकांना टीका करु द्या आपण विकास कामे करु असे प्रतिउत्तर आमदार समाधान दादा अवताडे यांनी आज मंगळवेढा तालुक्यातील माचणूर या गावी  श्री सिद्धेश्वर मंदिर येथे आपल्या प्रचाराचा नारळ फोडून आपल्या प्रचार सभेच्या प्रारंभ सुरू केला.

   या प्रचार सभेस उपस्थित प्रशांत परिचारक व अन्य असंख्य मान्यवर नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

   या वेळी आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की मला या मतदारसंघात फक्त अडीच वर्षे काम करण्यासाठी मिळाले.या अपुऱ्या कालावधीमध्ये मी तीन हजार कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.या निधी मधून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध गावांमधील रस्ते समाज मंदिरे , संविधान भवन,मराठा भवन,तामदर्डी बंधारा, मंगळवेढा पाणी उपसा सिंचन योजना, पंढरपूर एमआयडीसी मंजूर करून आणला, मतदारसंघातील विविध तीर्थ क्षेत्र विकास कामे, तसेच अनेक मंदीरांचा जिर्णोद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.अशी अनेक कामे मला मिळालेल्या कार्यकालात मी पूर्ण केली आहेत.मला पाच वर्षांचा कालावधी मिळाला तर मी आणि प्रशांत परिचारक आम्ही दोघे या मतदारसंघाचा विकास व कायापालट केल्याशिवाय राहणार नाही.या विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रशांत परिचारक यांनी सहकार्य केले आहे.याची जाणीव आहे.

   विरोधकांनी कधी गावभेट दौरा केला नाही.त्यामुळे  आम्ही केलेले विकास कामे ही दिसून येत नाही.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.या मतदारसंघाचा कायापालट होणार आहे.शेतकऱ्यांचे वीजेची बील माफ केली आहे.मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याने या भागातील लोकांना त्याचा लाभ होणार आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,व शेतीसाठी लागणारे पाणी प्रश्न हा संपला आहे.राज्य सरकारने विशेष लक्ष दिल्यामुळे ही विकास कामे पूर्ण झाली आहे.

    पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रशांत परिचारक यांची मदत लाभली आहे.व या पुढे देखील ते मदत करणार आहेत.आम्ही दोघे मिळून ही विकास कामे पूर्ण करणार आहोत.असे आपल्या प्रचार सभेच्या वेळी ही माहिती दिली.

    या प्रचार सभेला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....