"गटतट आणि पक्षाची चौकशी करणार्या या आमदाराला घरी बसवा".... भगिरथ भालके.


 पंढरपूर.... प्रतिनिधी....

    पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी हे सर्वसामान्य जनतेचे काम करताना हा कुठल्या पक्षाचा, हा कुठल्या गटाचा अशी चौकशी करून कामे करणार्या लोकप्रतिनिधी ला घरी बसवण्याची वेळ आली आहे. असे रान्झणी या गावी प्रचार सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांनी भाजपा च्या उमेदवारावर टीका केली.

    यावेळी हजारोच्या संख्येने लोकसमुदाय उपस्थित होता. आपल्या भाषणात पुढे बोलत असता ते म्हणाले हजारो कोटींचा निधी फक्त कागदावर आणला आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशा उमेदवाराला मतदार धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.

   शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव मिळावा म्हणून शेतकरी अदोलन करत असताना. तोंड बंद करून बसणार्या या लोकप्रतिनिधी ला शेतकर्याच्या पीकाची काळजी नाही. या बाबत कधीही विधान भवनात तोंड उघडलेलं नाही. शेती मालाचा प्रश्न असो की भाटगर च्या पाण्याचा प्रश्न असो. कधीही शेतकर्याची बाजू घेतली नाही. मतदार बंधू भगिनीना येत्या 20 तारखेला अशा बिनकामाच्या लोकप्रतिनिधी ला बदलण्याची वेळ आली आहे.

     आता ची ही निवडणूक कुण्या नेत्यांच्या हातात राहिली नाही. जनतेच्या हातात ही निवडणूक गेली आहे. मतदार आता बदल घडवल्या शिवाय राहणार नाही. असे महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आपल्या प्रचारसभेत मतदारांना संबोधित करताना म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....