"तुम्हाला काम करणारा उमेदवार पाहिजे की नातीगोती बघणारा नेता पाहिजे " .....मनसे नेते दिलीप बापू धोत्रे


 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतील उमेदवार दिलीप बाबू धोत्रे यांनी आपला गाव भेटीचा दौरा पंढरपूर तालुक्यामधील सुरू केलेला आहे. त्यांच्या गादेगाव येथील गाव भेटीच्या दरम्यान मध्ये त्यांनी सत्ताधारी आमदार हे निवडणुकीच्या तोंडावर नातीगोती व पाहुणेरावळे यांच्या संपर्कामध्ये ते राहू लागले आहेत. परंतु या आमदारांनी या नातेगोते व पाहुणेरावळ्यांना पाच वर्षात कधी साधे विचारपूस तरी केली आहे का ?असा सवाल करत दिलीप बापू धोत्रे यांनी सत्ताधारी आमदारावर सडकून टीका केली. तुम्हाला काम करणारा उमेदवार पाहिजे की नातेगोती बघणारा नेता पाहिजे?  असे विचारणा गादेगाव येथील ग्रामस्थांना त्यांनी केली. काम करणाऱ्या उमेदवाराला लोकांनी मतदान केले पाहिजे. मी काम करणारा माणूस आहे सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीला समस्येला धावून जाणारा मी आहे. कोरोना कालावधीमध्ये असंख्य लोकांना मी मदत केली आहे. गोरगरीब लोकांना मी अन्नदान व धान्य वाटपाच्या माध्यमातून माणुसकीच्या नात्यातून मी मदत केली आहे. महागडे हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्याची आर्थिक परिस्थिती नसलेल्या गोरगरीब लोकांसाठी मी 160 बेडचे हॉस्पिटल सुरू केले. त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यावरील प्रचंड मोठे खड्डे हे पडलेले असताना या खड्ड्यामुळे असंख्य लोकांचे अपघात झालेले आहेत ते अपंग झालेले आहेत. किती जणांची मृत्यू पावलेले आहेत ते खड्डे बुजवण्याचे काम मी केले आहे. स्वखर्चाने हे काम करीत असताना मी या तालुक्याचा या शहराचा रहिवासी असून मला सर्वसामान्यांच्या अडचणी समस्या समजतात परंतु आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यालयासमोरील खड्डे पडले असता त्यांनी तो साधा बुजवण्याचे देखील काम केलेले नाही. अशा लोकांना सर्वसामान्य जनता निवडून देईल का?  असाही प्रश्न गादेगाव येथील ग्रामस्थांना केला. 
      तरुण युवकांच्या हाताला काम न देऊ शकणारे हे सत्ताधारी काय कामाचे तरुणांच्यासाठी उद्योगधंदे निर्मिती करावीत व उद्योगधंद्यांना एमआयडीसीच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यांमध्ये आणावेत अशी अपेक्षा सर्वसामान्यांचे असताना सामान्यांची घोर निराशा या सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी केलेली आहे. एमआयडीसीला विरोध दर्शवणारे हेच भाजपाचे नेते आहेत. असाही आरोप त्यांनी गादेगाव येथील गाव भेटीच्या दरम्यान मध्ये केला. 
    यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते नाना कदम, संतोष कवडे, शशिकांत पाटील, गणेश पिंपळनेर तसेच गादेगाव येथील मनसेचे असंख्य कार्यकर्ते व विविध पक्षाचे विविध गटातटाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....