"बैलगाडा शर्यत पहाण्यास अलोट गर्दी " .. अभिजीत आबा पाटील यांनी शेतकऱ्यांचे मन केले काबीज.....


पंढरपूर (प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये थोड्याच दिवसात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत दादा पाटील यांनी माढा तालुक्यातील सर्व जनतेचे मन जिंकण्यामध्ये यशस्वी ठरल्याचे आज दिसून येत आहे.
    अभिजीत आबा पाटील यांनी संपूर्ण माढा विधानसभा मध्ये गावभेटीच्या माध्यमातून शेतकरी सुशिक्षित बेरोजगार तरुण त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिक, माता भगिनीयांच्यासाठी एक आशादायी चित्र माढा तालुक्यामध्ये निर्माण केल्याचे आज पहावयास मिळत आहे.
माढा तालुक्यातील विविध गावांमधून खेळ पैठणीचा कार्यक्रमा आयोजित करून माता-भगिनीचे मन जिंकल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांची आवडती शर्यत म्हणजे बैलगाडा शर्यत या बैलगाडा शर्यतीचे आयोजन माढा तालुक्यातील कुर्डवाडी रोडवरील असलेले बावी या गावी आज रोजी संपन्न होत आहे. या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी असंख्य शेतकरी वर्ग बावी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. 
  हजारोच्या संख्येने बैलगाडा शर्यतीचे आवड असणारे लोक शेतकरी वर्ग तरुण वर्ग या ठिकाणी जमलेला आज पहावयास मिळत आहे. लाखो रुपयांची बक्षिसे या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक. तृतीय क्रमांक , चतुर्थ क्रमांकाने विजयी होणाऱ्या शेतकरी दादाला लाखो रुपयांचे बक्षिसे ही दिली जाणार आहे. 
     श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी माढा तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबवून माढा तालुक्यातील मतदारांची जनतेचे माता भगिनींचे मन जिंकल्याचे आता दिसून येऊ लागले आहे.
    माढा तालुक्यातील जनता अभिजीत आबा पाटील यांच्याकडे एक नवे नेतृत्व तालुक्याला लाभणार आहे. या आशेने अभिजीत आबा पाटील यांच्याकडे पाहू लागले आहेत. अभिजीत आबा पाटील यांच्या झंजावाती दौऱ्यामुळे व विविध उपक्रम राबवून सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहे एवढे मात्र निश्चित.


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....