"मी बोलत नाही..... करुन दाखवतो"... आमदार समाधान आवताडे. पंढरपूर साठी M I D C.मंजूर.
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. हे पंढरपूर शहर व तालुका चार वाऱ्यांच्या वर चरितार्थ चालवणारे हे शहर व तालुका म्हणून ओळखला जातो.
या पंढरपुरासाठी एमआयडीसीची गरज असल्याचे मागणी गेल्या कित्येक वर्षापासून येथील नागरिकांची व युवकांची आहे. परंतु राजकीय उदासीनतेमुळे गेल्या 40-50 वर्षांमध्ये या ठिकाणी एमआयडीसी ही निर्माण होऊ शकलेली नाही. पंढरपूर सारख्या शहराच्या आजूबाजूला इंजीनियरिंग कॉलेज भरपूर असून त्याचप्रमाणे आयटीआय सारखे कोर्सेस असलेले विद्यालय आहेत. या महाविद्यालयांमधून बाहेर पडणारे असंख्य कुशल अर्धकुशल असे विद्यार्थी रोजगारासाठी नोकरीसाठी हे पुणे मुंबईच्या दिशेने जात आहेत. अशा तरुण शिक्षित विद्यार्थ्यांना त्यांच्या हाताला काम मिळवण्याच्या उद्देशाने पंढरपूर सारख्या ठिकाणी एमआयडीसीची गरज असल्याचे जाणवल्यामुळे एमआयडीसी ची मागणी ही मी आमदार या नात्याने महाराष्ट्र राज्य सरकारकडे सतत दोन वर्षे पाठपुरावा करून पंढरपूर सारख्या ठिकाणी एमआयडीसीची मंजुरी हे मिळवून आणलेली आहे. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या पंढरपुर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणच्या एमआयडीसीला मंजुरी दिलेली आहे. लवकरच या एमआयडीसीची भूमिपूजन होणार असून या ठिकाणी महाराष्ट्रातील मोठे उद्योजक हे आपले कारखाने व उद्योगधंदे सुरू करणार आहे. अंबानी अदानी तसेच टाटा या मोठ्या उद्योगपतींना पंढरपूर सारख्या ठिकाणी आपले उद्योगधंदे सुरू करावे अशी विनंती करण्यात आलेली आहे. त्यांनी सकारात्मक अशी भूमिका घेतलेली आहे पंढरपूर सारख्या ठिकाणी मोठे उद्योग धंदे हे सुरू होतील आणि येथील बेरोजगार तरुणांना त्यांच्या हाताला रोजगार भेटेल तसेच पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी त्यांच्या पिकावर विविध प्रक्रिया करणारे उद्योगधंदे हे देखील या ठिकाणी सुरू होणार असून या माध्यमातून तरुण बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे.शेतकऱ्यांना आपला जोडधंदा देखील सुरू करता येणार आहे. अशी माहिती आज पंढरपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी माहिती दिली.
गेली दोन वर्षे सातत्याने पंढरपूर येथील एमआयडीसी तसेच मंगळवेढा येथे पाणीटंचाईग्रस्त असलेले 24 गावे या गावाची पिण्याच्या पाण्याची सोय ही होणार आहे. त्याची मंजुरी आणलेली आहे. तसेच पंढरपूर येथील कासेगाव या भागातील एकूण साडेतीनशे एकरावर ही एमआयडीसी निर्माण होणार असून या ठिकाणी निर्माण होत असलेल्या एमआयडीसीसाठी अत्यावश्यक असलेले पाणीपुरवठा, रेल्वे वाहतूक, तसेच मोठे महामार्ग हे जवळ असल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या एमआयडीसीला महत्त्व आलेले आहे.
या जागेची पाहणी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी भेट दिलेली आहे. आणि या जागेला त्यांनी मंजुरी तसेच पसंती देखील दर्शवलेली आहे. अशी माहिती आज आमदार समाधान दादा .
अवताडे यांनी पत्रकारांनी दिली.
महाराष्ट्रातील मोठे मोठ्या उद्योजकांना या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे होणाऱ्या एमआयडीसीमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे.
पंढरपूर शहरासाठी एमआयडीसी होईल की नाही? अशी शंका विरोधक करत असताना त्या विरोधकांच्या बोलण्याकडे मी सातत्याने दुर्लक्ष करून मी निवडणुकीच्या वेळेला सर्वसामान्य जनतेला दिलेले आश्वासन त्यामधील प्रमुख आश्वासन म्हणजे पंढरपूर शहरासाठी एमआयडीसी आणि मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांच्या साठी पाणीपुरवठा योजना ही मंजूर करणे. असे दिलेले आश्वासन मी पूर्णत्वास नेले आहे. एमआयडीसी व मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न हा मी गेल्या दोन वर्षातील सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सोडवू शकलो. " मी माझ्या भाषणामधून कमी बोलतो परंतु मी जे बोलतो ते करून दाखवतो." ही माझ्या कामाची पद्धत असून मी बोलल्याप्रमाणे एमआयडीसी ही मंजूर करून आणलेली आहे. याचे समाधान मला लाभले आहे. पंढरपूर शहर व तालुक्यातील बेरोजगार तरुणांसाठी एमआयडीसी सारखा प्रकल्प मी आणू शकलो. मी तरुण बेरोजगार तरुणांना एमआयडीसीचा दिलेला शब्द मी पूर्ण केलेला आहे. असे देखील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
यावेळी भाजपाचे असंख्य कार्यकर्ते व स्थानिक नेते मंडळी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा