"पुढील आयुष्य जन कार्याला समर्पित"......मा. उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले.
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंचवीशी मधील तरुणांना लाजवेल असे व्यक्तिमत्व म्हणजे नागेश भोसले.
नागेश भोसले यांचे व्यक्तिमत्व म्हणजे एक ज्वलंत उत्साहाचा झरा आणि कोणत्याही कामाला सकारात्मक विचाराने ते काम पूर्णत्वास नेण्याची धडाडी व धाडस असणारे व्यक्तिमत्व म्हणजे नागेश काका भोसले.
नागेश भोसले यांनी आपल्या सार्वजनिक कार्याला सुरुवात 2001 सालापासून केली असे म्हटले तर वावगे ठरू नये. पंढरपूर शहरातील विविध सामाजिक घटकांना तसेच गोरगरीब, कष्टकरी बेरोजगार तरुणांना योग्य मार्गाला लावणारे एक नेतृत्व, अडचणीमध्ये तसेच संकटामध्ये असलेल्या व्यक्तीला अडचणीतून आणि संकटांमधून बाहेर काढण्याचे कौशल्य नागेश भोसले यांच्याकडे असल्याचे सातत्याने दिसून येते.
उच्च विद्या विभूषित असलेले नागेश भोसले आपला पिढी जात असलेला मालवाहतूक हा व्यवसाय त्यांनी अवलंबून ते स्वतः आपला ट्रक चालवून आपली पुढील शिक्षण त्याने पूर्ण केले. सदैव इतरांच्या मदतीला धावून जाणे इतरांच्या अडचणी सोडवणे या त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ते कधी राजकारणाच्या दिशेने आले हे समजलेच नाही.
2001 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. आपला स्वतःचा प्रभाग नसताना देखील ते अन्य ठिकाणाहून प्रचंड मताधिक्याने ते निवडून आले. नागेश काका भोसले यांच्या सर्व समावेशक स्वभावामुळे ते सहजपणे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले. त्यांच्या कार्यामुळे व सामाजिक संपर्कामुळे त्यांच्यासोबत असलेल्या अन्य उमेदवारांना देखील नागेश भोसले यांच्या उमेदवारीचा फायदा झाला. हे संपूर्ण पंढरपूर वाशी जाणून आहेत.
पंढरपूर नगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून ते उपनगराध्यक्ष पदापर्यंत त्यांनी आपल्या कार्याने मजल मारली. पुढे कालांतराने नगराध्यक्ष पद हे खुले प्रवर्गास गेल्यानंतर त्यांच्या धर्मपत्नी सौ साधनाताई नागेश भोसले यांना उमेदवारी मिळून सौ साधना भोसले यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे श्रेय फक्त आणि फक्त नागेश काका भोसले यांना जाते. पंढरपूर नगरपालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच महिला नगराध्यक्ष म्हणून सौ साधना नागेश भोसले या सलग साडेसात वर्ष त्या नगराध्यक्षा म्हणून पंढरपूर नगरपालिकेचा व तसेच शहराचा कारभार पाहिला. अनेक सुखसुविधा व सुधारणा सौ साधना भोसले यांनी आपले पती नागेश भोसले यांच्या सहकार्याने पूर्ण केले.
नागेश भोसले यांनी आज पर्यंत असंख्य बेरोजगार युवकांना त्यांच्या हाताला काम दिलेले आहे. कित्येक गरजू तरुणांना रिक्षा घेऊन देण्यास तसेच ट्रक घेऊन देण्यास त्यांनी मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकामधून मालवाहतुकीच्या माध्यमातून नागेश भोसले यांनी शेकडो मजुरांना काम मिळवून दिलेले आहे. असंख्य ट्रक व्यवसायीक बांधवांना त्यांनी सहकार्य केलेले आहे.
माजी उपनगराध्यक्ष तसेच पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन म्हणून नागेश काका भोसले यांनी मोठी महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. व्यापारी बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य सभासद तसेच व्यापारी वर्ग यांच्या उद्योग व्यवसायामध्ये भरभराट व्हावी म्हणून त्यांनी पंढरपूर मर्चंट बँकेचे माध्यमातून असंख्य व्यावसायिकांना व सभासदांना सहकार्य केलेले आहे.
कुठलीही व्यक्ती मग ती व्यक्ती ओळखीचे असो किंवा अनोळखी असो अशा व्यक्तीचा साधा मिस कॉल जरी आला तर त्या मिस कॉल ला पुन्हा एकदा फोन करून त्या व्यक्तीकडे काय काम आहे? म्हणून विचारपूस करणार त्या संबंधित व्यक्तीचे काम केल्याशिवाय ते राहत नाही. रात्री बे रात्री कोणीही मदतीसाठी त्यांना जरी फोन केला तर ते स्वतः जातीने त्या ठिकाणी उपस्थित राहतात. याचा अनुभव पंढरपूर वाशी यांनी घेतलेला आहे.
नागेश काका भोसले यांना पत्रकारांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा चा स्वीकार करीत नागेश काका भोसले पत्रकारांशी बोलत असताना ते म्हणाले आता या पुढील आयुष्य जन कार्याला समर्पित असणार आहे. गोरगरीब कष्टकऱ्यांचे भले करण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढील आयुष्य घालवायचे आहे. असे नागेश काका भोसले यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा