" मै हूॅं ना " या आश्वासनाची कार्यकर्ते ना अपेक्षा.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तमाम जनतेला परिचारक कुटुंबातील राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे उमेश परिचारक यांच्या वाढदिवसा निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता व कार्यकर्ते हे उमेश परिचारक यांनी येत्या विधानसभेला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी. अशी मागणी व अपेक्षा व्यक्त करीत आहे. 

       पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील वजनदार असलेला परिवार म्हणून ओळखला जाणारा श्री पांडुरंग परिवार हा परिचारक यांचा परिवार म्हणून ओळखला जातो. या पांडुरंग परिवाराच्या वतीने व सर्वसामान्य जनतेमधून येत्या विधानसभेला उमेश परिचारक यांनी आपली उमेदवारी जाहीर करून पांडुरंग परिवाराला पुन्हा एकदा आमदारकी मिळवून द्यायला हवी. अशी अपेक्षा व मागणी होत आहे. 

      पंढरपूर तालुक्यामधून तसेच मंगळवेढा तालुक्यामधून सर्व कार्यकर्ते व विविध संघटनेतील सदस्य सर्वसामान्य शेतकरी तसेच तरुण वर्गातील लोकप्रिय युवा नेतृत्व म्हणून उमेश परिचारक यांना ओळखले जाते. त्याचप्रमाणे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील उमेश परिचारक हे किंगमेकर ची भूमिका नेहमीच बजावत आलेले आहेत .उमेश परिचारक यांनी अशाच पद्धतीची किंगमेकर ची भूमिका गत पंचवार्षिक विधान परिषदेला सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेची जागा अतिशय चाणाक्षपणे व राजकीय असंख्य डावपेच करून त्यांनी प्रशांतराव परिचारक यांना विधान परिषदेची आमदारकी मिळवून देण्यामध्ये त्यांचा मौल्यवान हातभार होता. याची जाणीव संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला आहे. म्हणूनच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता व परिचारक गटातील कार्यकर्ते आज उमेश परिचारक यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्याच्या विधानसभेला आपली उमेदवारी जाहीर करून पांडुरंग परिवाराला आमदारकीचे पद मिळवून सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार तरुण, ऊस उत्पादक शेतकरी ,तसेच महिला माता-भगिनींना विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून सहकार्य व योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी उमेश परिचारक यांनी येता विधानसभेला आपली उमेदवारी जाहीर करावी. अशी अपेक्षा उमेश परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पांडुरंग परिवार व परिचारक गटातील कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता "मैं हूॅं ना" या आश्वासनाची अपेक्षा व्यक्त करीत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....