"कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाच्या लौकिकात भर टाकणार".... अध्यक्ष आदित्य भोसले.
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील लोकप्रिय असे म्हणून गणले गेलेले कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळ या मंडळाची नुकतीच अध्यक्षपदाची व कार्यकारणीची निवडीचा कार्यक्रम पार पडला.
कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी आदित्य रणजीत भोसले तसेच उपाध्यक्ष सुहास शिंदे, यश पवार सचिव युवराज भोसले खजिनदार शैलेश भोसले आदी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.
कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते नगराध्यक्ष नागेश काका भोसले तसेच श्री विठ्ठल हॉस्पिटल संघर्ष समितीचे व पंढरपूर शहर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष किरण आप्पा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनानुसार विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाचे नूतन अध्यक्ष आदित्य भोसले यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आपल्या मनोगतामध्ये त्यांनी कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष पद हे महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद असून या पदाची व कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाच्या नावलौकिकामध्ये भर टाकण्याचे कार्य आपण करणार आहोत. या गणेश मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य भाविक भक्त यांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आहे.आमच्या मंडळाचे आधारस्तंभ व मार्गदर्शक नागेश काका भोसले व किरण आप्पा भोसले तसेच पृथ्वीराज भोसले विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले सुधीर आबा भोसले आधी जेष्ठ मान्यवराच्या मार्गदर्शनाच्या खाली मला काम करण्यास मिळत आहे. हे माझे भाग्य समजतो .असे कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाचे नूतन अध्यक्ष आदित्य रणजीत भोसले यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळ हे मंडळ नेहमीच नवीन तरुणांना संधी देत असते. या कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळांमध्ये शेकडोच्या संख्येने सभासद असून या मंडळाच्या वतीने पंढरपूर शहरातील सर्वात मोठे ढोल ताशा पथक म्हणून ओळखले जाते. या मंडळाची ढोल ताशा ची मिरवणूक ही संपूर्ण पंढरपूर शहराचे लक्ष वेधून घेत असते.
कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाचे सर्व सदस्य व सभासद या नूतन अध्यक्ष पदाच्या व अन्य पदाच्या निवडीकरिता उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा