'येत्या विधानसभेच्या निवडणुकीला प्रशांत परिचारक हे निवडून यावेत म्हणून सूर्यनारायणाला साकडे'..... लक्ष्मण तात्या धनवडे
पंढरपूर ( प्रतिनिधी गोकुळ अष्टमी चा दिवस हा पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.
माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील विविध गावांमधून प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली या सूर्यनारायणाच्या गावामध्ये तेथील परिचारक गटाचे व पांडुरंग परिवार चे नेते लक्ष्मण तात्या धनवडे यांनी पुढाकार घेत नारायण चिंचोली या गावी जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमांमध्ये भारूडकार राष्ट्रपती पदक विजेत्या चंदाताई तिवाडी यांचे लोकप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामधून स्त्री शिक्षण, मुलगी बचाव, स्वच्छता मोहीम, आधी विविध जनजागृती चे कार्यक्रम भारुडाच्या माध्यमातून चंदाताई यांनी सादर केले. त्याचप्रमाणे नारायण चिंचोली येथील मागासवर्गीय ग्रामस्थांना चादरीचे वाटप मान्यवर यशवंत कुलकर्णी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे एमडी यांच्या हस्ते तसेच पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे टी वाय मुजावर या पोलिस निरीक्षक साहेबांच्या हस्ते व गटविकास अधिकारी यांच्या हस्ते चादरीचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे गतवर्षी प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आभा या योजनेसाठी 370 लोकांचे नाव नोंदणी केलेली होती. अशा 370 लोकांना आभा या योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. आणि नारायण चिंचोली या गावी असलेल्या गरोदर माता भगिनींना त्यांना साडी चोळीचा मान देऊन त्या गरोदर महिलांना पौष्टिक आहार म्हणून काजू बदाम असे ड्रायफूट देण्यात आले. आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण हे देखील करण्यात आले. नेहमीच्या प्रमाणे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम नारायण चिंचोली ग्रामस्थ राबवत असतात. गावाचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने गावातील प्रत्येक घराला कचरा साठवणीचे डस्टबिन हे देण्यात आले. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे साठी हा उपक्रम देखील राबवण्यात आला. व प्रत्येक घराला असे डस्टबिन देण्यात आले. अशी माहिती पांडुरंग परिवाराचे नेते व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे यांनी दिली.
माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी नारायण चिंचोली येथील ग्रामदैवत सूर्यनारायण या देवतेला साकडे घालण्यात आले. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रशांतराव परिचारक यांना प्रचंड मताधिक्याने निवडून यावेत .अशी मागणी व साकडे ग्रामदैवत सूर्यनारायणाला करण्यात आली.
या कार्यक्रमाला उपस्थित पांडुरंग परिवार तसेच परिचारक प्रेमी लोक त्याचप्रमाणे परिचारक गटाचे कार्यकर्ते व गावातील सर्व माता-भगिनी ज्येष्ठ व तरुण मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा