"अभ्यासासाठी सहा ते आठ" हा उपक्रम राबवणाऱ्या माजी सरपंच संजय घाडगे यांचा माता भगिनी कडून राखी बांधून सत्कार...
पंढरपूर ( प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील देगाव या गावी संजय घाडगे यांनी आपल्या सरपंच पदाच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाच्या विविध योजना राबवून व त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून मंजूर करत आपल्या देगाव गावचा विकास करण्यासाठी त्यांनी सुमारे 14 कोटी रुपये पेक्षाही अधिक निधी त्यांनी गावासाठी खेचून आणला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या गावातील मुलं मुली या शालेय शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यांना मोबाईल पासून व टीव्हीपासून अलिप्त राहण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी एक योजना आखून संध्याकाळी सहा ते आठ या या कालावधीमध्ये गावातील कोणीही घरातील लोकांनी मोबाईल व टीव्ही लावणे या कालावधीमध्ये बंद ठेवण्याचे विनंती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी टीव्ही व मोबाईल पासून अलिप्त राहून आपला शैक्षणिक अभ्यास करावा अशी योजना त्यांनी अमलात आणली होती. संपूर्ण महाराष्ट्रभर ही योजना प्रसिद्ध झाली. या योजनेचे संकल्प संजय घाडगे हे होत.
देगाव गावातील गोरगरीब लोकांची बंद पडलेले रेशनिंग कार्ड सुरू करून दिली. लाडकी बहीण योजनेचे मोफत अर्ज भरून देणे. तसेच अनेक छोट्या मोठ्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी देगाव मधील जनतेचे प्रेम मिळवले आहे. याचाच भाग म्हणून काल देगाव गावातील शेकडो महिलांनी एकत्र येत त्यांना राखी बांधून अनोखी भेट दिली.
माजी सरपंच संजय घाडगे यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये असंख्य लोक उपयोगी योजना व कार्यक्रम त्यांनी राबविलेले आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये गावातील नागरिकांना आर्थिक तसेच रुग्णालयातील सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केल्याने त्यांचे नाव चर्चेत आले होते. त्यांनी आपल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये देगाव गावासाठी आरोग्य उपकेंद्र मंजूर करून घेतले. तसेच श्री संध्याकाळी देवी पर्यटन विकास आराखडा या अनेक कामांना मंजुरी मिळवून दिली आहे.
असे हे माजी सरपंच संजय घाडगे यांना रक्षाबंधनाच्या दिवशी गावातील माता भगिनींनी राखी बांधून त्यांच्या सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा