"पंढरपूर बस स्थानक स्वच्छ करून घ्या अन्यथा....खैर नाही ". आमदार समाधान दादा अवताडे
पंढरपूर ( प्रतिनिधी) वैकुंठ नगरी आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र पंढरपूर. या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक भक्त, वारकरी संप्रदाय त्यांच्या पालख्या व दिंड्या या चार वारीच्या निमित्ताने पंढरपूर शहरांमध्ये येत असतात.
पंढरीच्या पांडुरंगाला भेटीसाठी येणारे असंख्य लोक हे रेल्वेने व एसटीने प्रवास करीत असतात. पंढरपूर येथील असलेले भव्य असे बस स्थानक हे नेहमीच घाणीच्या साम्राज्यामध्ये वसलेले आहे की काय? अशी शंका भाविक भक्तांना होत असते. नुकतेच पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे यांनी अचानकपणे पंढरपूर बस स्थानकाला भेट दिली असता तेथे असलेले घाणीचे साम्राज्य पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. आमदार अवताडे यांनी पंढरपूर बस स्थानकामध्ये संपूर्ण ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर त्यांना सर्वत्र घाणीचे व कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले. प्रवासी एसटी महामंडळाचा प्राण असल्यामुळे या प्रवासाच्या जीवावर व भरवशावर एसटी महामंडळ हे चालते प्रवाशांच्या आरोग्याची काळजी एसटी महामंडळाने घ्यायला हवी. परंतु पंढरपूर बस स्थानकामधील घाणीजे साम्राज्य, कचरा आणि उघड्यावर शौच व लघु शंका करणाऱ्यांची संख्या ही जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. दुर्गंधीने भरलेले असे हे पंढरपूर बस स्थानक म्हणून ओळखले जाऊ लागलेले आहे.
या बस स्थानकावर आमदार अवताडे यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी सुविधांचा अभाव त्यांना दिसून आला त्यामध्ये बस स्थानकातील शौचालय, पिण्याचे पाणी, फलाट, तसेच बस स्थानकाच्या बाहेर व आतील बाजूस असलेले व्यापारी गाळे या ठिकाणी जागोजागी कचरा व घाण साठलेली पाहायला मिळाली. त्यामुळे आमदार आवताडे चांगले संतापले आणि त्यांनी महामंडळ अधिकाऱ्यांना फायली वर घेतले. यावेळी आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुख गैरहजर होते. त्यांना आमदार समाधान आवताडे यांनी फोन करून स्वच्छता कंत्राटदार कोण आहे? आणि तो योग्य पद्धतीने त्याचे काम करत नसेल तर त्याच्यावर कारवाई का केली जात नाही.? असा सवाल केला त्याचबरोबर बस स्थानक परिसरातील जागोजागी पडलेला कचरा एका आठवड्यात पूर्ण स्वच्छ करून घ्या मी पुढच्या आठवड्यात पुन्हा येईन आणि स्वच्छता झाली असल्याची खात्री करेल असे सांगितले. यावेळी आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत प्रांत अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, नगरपरिषद चे उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर परिवहन महामंडळाचे वाहतूक निरीक्षक दळवे यांच्यासह इतर अधिकारी व आमदार समाधान आवताडे यांचे कार्यकर्ते प्रवासी व बस स्थानक परिसरातील व्यापारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा