"माढ्याच्या राजकिय आखाड्यात सर्व डावपेच वापरणार".... मैदान जिंकणार.... अभिजीत आबा पाटील
पंढरपूर ( प्रतिनिधी) . श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माढा तालुक्यातील टेंभुर्णी या गावी भव्य निकाली कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य कुस्ती च्या निमित्ताने माढा विधानसभा मतदारसंघांमधून आपली उमेदवारी ही असणार असल्याचे संकेत अभिजीत पाटील यांच्या जनसंपर्कच्या माध्यमातून सर्वत्र दिसून येत आहे.
अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टेंभुर्णी येथे माढा केसरी 2024 निकाली कुस्ती मैदानाचे दिनांक 18 रोजी टेंभुर्णी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी माढा तालुक्यातील सर्व राजकीय पक्षातील नेतेगण व राज्यभरातील कुस्ती मल्ल, वस्ताद व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिजीत पाटील या कुस्ती स्पर्धेच्या वेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत असताना म्हणाले विधानसभेच्या आखाड्यात आपण उतरणार असून माढ्याच्या राजकीय आखाड्यात सर्व डावपेच वापरणार असून या माढा विधानसभेला मी मैदान मारणार आहे. असे त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
यावेळी मोठ्या कुस्तीमध्ये बलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान आशिष उड्डा यांची निकाली कुस्तीमध्ये पैलवान आशिष उड्डा यांनी आपली बाजी मारून मानाची गदा मिळवली. याच अनुषंगाने अभिजीत पाटील यांनी माढा मतदारसंघातून गाठीभेटीवर जोर दिला असून माढा तालुक्यात कुस्तीचे मैदान भरवले तर माढा तालुक्यात विविध गावांमध्ये खेळपैठणीचे कार्यक्रम आयोजन करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा