" अभिजीत पाटील माढा विधानसभा मतदारसंघामधून सक्रिय"विविध कार्यक्रमांना उस्फुर्त प्रतिसाद.
पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी नुकतेच माढा विधानसभा मतदारसंघांमधून आपली उमेदवारी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. माढा विधानसभा मतदारसंघांमधील कित्येक शेतकरी ऊस उत्पादक सभासद हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद असून माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये पंढरपूर तालुक्यातील कित्येक गावांचा समावेश असल्यामुळे अभिजीत आबा पाटील यांनी आपण या माढा विधानसभा मधून निवडून येऊ शकतो. असे त्यांनी म्हटले. माढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस त्यांनी श्री विठ्ठल साखर कारखान्याला गाळप करून घेतलेला आहे. त्यामुळे या माढा विधानसभेतील जनता अभिजीत पाटील यांच्या धडाडीच्या नेतृत्वाला माढा विधानसभा मधून संधी देण्याची चर्चा सध्या माढा तालुक्यामधील जनतेमधून आहे.
अभिजीत आबा पाटील यांनी माढा विधानसभे मधून आपला जनसंपर्क हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानिमित्ताने त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे देखील त्यांनी ठरवले आहे. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नुकतीच उंदरगाव या ठिकाणी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करून माता भगिनींसाठी रक्षाबंधन व नागपंचमीच्या या सणाच्या निमित्ताने खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न करून दाखविला. माढा तालुक्यातील असंख्य माता-भगिनी या अभिजीत पाटील यांचे कौतुक करीत आहे. अभिजीत पाटील यांच्या सहकाऱ्यांनी या उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केले असता सुप्रसिद्ध निवेदका मोनिका जाजू यांच्या उत्कृष्ट निवेदनातून दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा हेतू सफल झाला. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावे या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भाऊसाहेब महाडिक देशमुख, ऋषिकेश काका तांबिले, उपसरपंच समाधान मस्के, संजय बापू तांबिले, आबासाहेब साठे, नंदकिशोर आरे, मगन नाईकवारे, सुधीर लवटे, सुरज कांबळे, वायजी भोसले, ग्रामपंचायत सदस्य केवड अमोल धर्मे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा